Breaking

शनिवार, ३१ मे, २०२५

रांझणी येथील ओंकारनाथ तीर्थक्षेत्राचा ' ब ' वर्गात समावेश करावा संजय पाटील भिमानगरकर



रांझणी येथील ओंकारनाथ तीर्थक्षेत्राचा ' ब ' वर्गात समावेश करावा संजय पाटील भिमानगरकर 


मा. आमदार संजय मामा शिंदे व संजय पाटील यांनी दिले पालकमंत्री जयकुमार गोरे यांना पत्र 



टेंभुर्णी प्रतिनिधी 

रांझणी तालुका माढा येथील ओंकारनाथ देवस्थान आहे या देवस्थानाला संजय पाटील  भिमानगरकर हे सोलापूर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती असताना त्यांच्या पाठपुराव्यामुळे 28 ऑक्टोंबर 2005 च्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ' क ' वर्ग चा दर्जाचा प्रस्ताव मंजूर होऊन त्यावेळेस या देवस्थानात 57 लाख 35000 रूपये मंजूर झाले होते त्यामधून देवस्थाना जवळ एका मोठ्या कार्यालयाचे बांधकाम झाले याच कार्यालयामुळे कोरोना काळात त्या ठिकाणी कोरोना सेंटर काढून कितीतरी लोकांना क्वारंटाईन होण्यास मदत झाली तसेच या कार्यालयांमधून गोरगरिबांच्या लग्नासाठी नाममात्र भाड्याने ग्रामपंचायतीमार्फत सर्वसामान्यांना तो हॉल भाड्याने दिला जातो व गावातील सर्व कार्यक्रम त्या हॉलमध्ये होतात 

ग्रामपंचायत ने 27 एप्रिल 2025 रोजी शासनाला प्रस्ताव सादर केलेला आहे त्यामुळे तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर देवस्थानास येणाऱ्या लाखो भाविकांची सोय होणार आहे रांझणी देवस्थानाला लाखो भाविक दरवर्षी भेट देत असतात प्रत्येक वर्षी लघु रुद्राभिषेक, रामनवमी,हनुमान जयंती व महाशिवरात्री प्रत्येक अमावस्येला, गुढीपाडवा ते रामनवमी तसेच अखंड हरिनाम सप्ताह, हनुमान जयंती यात्रा,गोकुळाष्टमी, दत्त जयंती,नाथष्टमी या काळात मोठा उत्सव भरला जातो व लाखो भाविक देवस्थानला मनोभावे भेट देत असतात या देवस्थानास ' ब ' वर्ग दर्जा मिळाल्यानंतर त्या ठिकाणी भाविकांची सोय होऊन देवस्थान हे अक्कलकोट,गाणगापूर या देवस्थानां प्रमाणेच नावारूपाला येईल असा संजय पाटील भिमानगरकर यांनी विश्वास व्यक्त केला आहे. 

रांझणी येथील ओंकारनाथ तीर्थक्षेत्रास ' ब ' वर्गात समावेश करावा यासाठी माढा तालुक्याचे मा.आमदार बबनराव शिंदे यांच्या शिफारशीने मा. आमदार संजय मामा शिंदे व संजय पाटील भिमानगरकर यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना पत्र देऊन पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा