Breaking

शनिवार, २१ जून, २०२५

रांझणी देवाची येथे बबनदादांच्या प्रकृतीसाठी सामुहिक 21 जणांचा रुद्र अभिषेक


रांझणी देवाची येथे बबनदादांच्या प्रकृतीसाठी सामुहिक 21 जणांचा रुद्र अभिषेक

माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या अमेरिकेत होणार मोठी शस्त्रक्रिया

टेंभुर्णी प्रतिनिधी

माढा तालुक्याचे माजी आमदार बबनराव शिंदे हे ह्रदय शस्त्रक्रियेसाठी अमेरीका येथे गेले आहेत . त्यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडावी व त्यांना उदंड आयुष्य लाभावे ,यासाठी रांझणी देवाची ता.माढा येथील ओंकारनाथ मंदिरामध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या 21 कर्मचाऱ्यांनी सामूहिक रुद्र अभिषेक घालत ओंकारेश्वर देवाकडे बबन दादा उपचार करून लवकर परत यावे तसेच त्यांना उदंड आयुष्य लाभण्यासाठी साकडे घालण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी केले होते.
         यावेळी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे मुख्य शेती आधिकारी संभाजी जगताप व समाधान पाटील ऊस पुरवठा अधिकारी हनुमंत गिड्डे,ॲग्रीओव्हरशिअर बळीराम नलवडे,राहुल घाडगे, विनायक बोडके, प्रदीप राजमाने, नागनाथ माने,बिटप्रमुख शहाजी चव्हाण, शशीकांत रूपनवर, विकास गायकवाड, धनाजी घोडके,भारत जगताप, संतोष व्यवहारे,सिकंदर जगताप, महादेव चव्हाण, आनंद लोंढे, सौदागर क्षीरसागर, प्रदीप चंदनकर, जगन्नाथ काळे,नितीन सलगर, जोतीराम घाडगे.इ कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा