जनपरिवर्तन विकास आघाडीच्या वतीने आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांना दिले
सोलापूर-पुणे जुन्या हायवेवरील स्ट्रीट लाईट व हायवेच्या बाजूने ड्रेनेज लाईन करण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी
टेंभुर्णी- सोलापूर-पुणे हायवे तसेच अकलूज रोडवरील दोन वर्षांपासून बंद असलेल्या स्ट्रीट लाईट सुरु कराव्या,हायवेच्या बाजूने ड्रेनेज लाईनचे काम करावे यासाठी आपण स्वतः लक्ष देऊन शासन दरबारी पाठपुरावा करावा यासाठी रावसाहेब देशमुख व राष्ट्रवादी युवक काँग्रेस (श.प.) जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख यांनी सुचित केल्याप्रमाणे जनपरिवर्तन विकास आघाडीच्या वतीने विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना आज टेंभुर्णी येथे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,मागील दोन वर्षांपासून स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे नागरिकांना तसेच व्यापारी वर्गाचा यांचा रात्रीच्या वेळी नाहक त्रास होत आहे. याकडे कोणीच लक्ष देत नसल्यामुळे आपण स्वतः पाठपुरावा करावा. हायवेच्या बाजूला कोणतेही ड्रेनेज काम झाले नसल्यामुळे पावसाचे पाणी व सांडपाणी व्यापारी वर्गाच्या दुकानापुढेच साचत आहे. या पाण्याच्या दुर्गंधीमुळे ग्राहकांच्या खरेदीवर परिणाम होत आहे.हायवेवरील रस्त्यांची लेवल व्यवस्थित झाली नाही यामुळे विविध ठिकाणी पावसाचे पाणी तेथेच थांबत आहे. तरी याकडे आपण लक्ष देऊन हे दोन्ही महत्त्वाचे विषय शासन दरबारी मांडून मार्गी लावेत असे म्हटले आहे. हे निवेदन देतेवेळी गोरख बप्पा देशमुख,सोमनाथ कदम,परमेश्वर देशमुख,गणेश केचे,महादेव जगताप,ग्रामपंचायत सदस्य वैभव महाडिक,शैलेश ओहोळ,अप्पासाहेब हवलदार,सूर्यकांत खरात,संतोष देशमुख,शिवाजी येवले-पाटील,प्रशांत देशमुख,रणजित अटकळे,श्रीधर भोसले,बाळासाहेब बारवे,गणेश सरवदे,अविनाश लोंढे,शारंग गायकवाड,सुरेश देशमुख,नागेश देशमुख,गणेश खरात,विशाल खरात,लखन हवलदार,निलेश खरात,आकाश सुतार,जयवंत देशमुख,लखन माने,अनिल माने,सुजल कांबळे,मयुर मुसळे,संदिप साळुंखे,विष्णू राऊत,नयन चव्हाण,रितेश देशमुख,शुभम शिंदे,आनंद खरात,अदित्य देवकर,बालाजी भरगंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा