Breaking

सोमवार, २० जुलै, २०२०

*शिवधर्म फाउंडेशनच्या पश्र्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निशा ताई बिडवे तर दत्तात्रय जगताप यांची पुणे जिल्हाअध्यक्ष पदी निवड*

*शिवधर्म फाउंडेशनच्या  पश्र्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निशा ताई बिडवे तर दत्तात्रय जगताप यांची पुणे जिल्हाअध्यक्ष पदी निवड*

 इंदापूर प्रतिनिधी ; शिवाजी पवार [aj24taas ]
*********************************-*****


इंदापुर  दि.     शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य  ही एक सामाजिक संघटना आहे. ज्याच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात. यामध्ये   कोणत्याही सामाजिक अडचणीत सामान्य माणसांसाठी चळवळ उभा करण्यासाठी प्यारति संघटनेची स्थापना कलेेली आहे.  अशी माहिती शिवधर्म फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष पै. दिपकआण्णा सिताराम काटे यांनी दिली. तसेच महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध पद वाटप करुन प्रत्येकाला जबाबदारी वाटून देण्याचे काम सुरू आहे.
सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जगताप यांची निवड पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना अनेक वर्षांपासून समाजसेवेचा प्रदिर्घ अनुभव आहे. संघटनेने दिलेल्या जबाबदारी ला शंभर टक्के न्याय देऊन समाजातील सर्व प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील रहाणार असल्याचे  पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.

तसेच महिला सक्षमिकरणासाठी शिवधर्म फांउडेशनच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी निशाताई बिडवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच्या अगोदर त्या ग्राज्युवेट फोरम ऑफ महाराष्ट्र च्या अध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या.  तसेच त्यांनी एम. बी. ए. फायनान्सचे शिक्षण घेतले आहे. त्या स्वता एक उच्च शिक्षित पदवीधर असल्यामुळे त्यांना पदवीधरांच्या सर्व प्रन्शांची जाणीव आहे. पदवीधर विद्यार्थ्यांनचे प्रश्न सरकार समोर मांडण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या पुणे पदवीधर मतदार संघांतुन येणारी निवडनुक  लढणार आहेत.




  बिडवे यांचे महिला सक्षमिकरणा मध्ये मोठे योगदान आहे.त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात अनेक महिला मेळावे घेऊन महिलांना स्वताच्या पायावर उभा राहण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन दिपकआण्णा सिताराम काटे यांनी त्यांना शिवधर्म फाउंडेशन पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष पदांची जबाबदारी दिली आहे.यानंतर आपण पश्र्चिम महाराष्ट्रात महिला सक्षमिकरणा साठी तसेच पदवीधरांच्या प्रश्नांसाठी पुर्ण ताकदीने काम करणार असल्याचे निशा बडवे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा