.
*टेंभुर्णी ट्राफिक पोलिस आणि होमगार्डमध्ये फिल्म स्टाईलने मारामारी*
टेंभुर्णी [प्रतिनिधी] दि.25 कोरोना महामारी च्या संकटामुळे मंदीच्या काळात अनेक छोटे मोठे व्यवसाय अडचणीत आले असून शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आणखीन काही व्यवसाय बंद आहेत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने ज्या उपाययोजना करण्यात येत आहेत त्या नक्कीच स्वागतहार्य आहेत परंतु त्याची अंमलबजावणी करताना टेंभुर्णी पोलिसाकडून काहीवेळा प्रचंड अतिरेक होत असल्याचे नागरिकांतुन उलट-सुलट बोलले जात आहे की डबल सीट मोटरसायकल वरील कारवाई दूध घेऊन येणारी दूधवाले सकाळी फळ भाज्या घेऊन टेम्भूर्णी मंडईला येणारे शेतकरी तसेच दिवसभराच्या काळात खते बी बियाने खरेदी साठी येणारे शेतकरी यांना रस्त्यात अडवून टेंभुर्णी पोलिसाकडून कोरणा च्या नावाखाली पावती चा धाक दाखवून मोठ्या प्रमाणावर पैसे वसूल करण्यात येत आहेत त्यातून प्रसंगी पोलिसांच्या बरोबरीने काम करणारे होमगार्ड सुटत नाहीत असाच प्रकार काल दुपारी टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीत टेंभुर्णी- कुर्डूवाडी रोडवर पाहायला मिळाला .सविस्तर वृत्त असे की माढा तालुक्यात होमगार्ड म्हणुन कामकरणारा एक तरुण माढयावरुन येत असताना कुर्डूवाडी- टेंभुर्णी बायपास खाली कोरोना प्रतिबंधक कारवाई करत असताना प्रवाशांना आडऊन.पोलिसानकडून कारवाई च्या नावाखाली पैसे वसुल करत आसल्याचे त्याच्या नजरेत पडले असताना ही तो ही आपलीच गाडी साईटला घेऊन थांबला होता तेव्हा पोलिस आणि त्याच्या मध्ये पैशाच्या देवान घेवान वरुण वाद झाला त्यावेळी त्त्यांनी सांगीतले की मी होमगार्ड तुमचाच आहे साहेब वाद घालु नकोआशी दोघांन मध्ये बाचा-बाची झाली त्याचे पर्यवसन बाचाबाचीतच झाले व नंतर होमगार्ड व टेंभुर्णी पोलिसात फिल्मस्टाईलने मारामारी झाली समजते. हा सगळा प्रकार रस्त्यावर घडल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती नंतर होमगार्ड
टेंभुर्णी पोलिसस्टेशनला आनुन आक्षय अगतराव कारंडे या तरुणावर टेंभुर्णी पोलिसात भा.द.वी. कलम 353/354 प्रमाने गुन्हा दाखल केला असुन सदर तरुण हा होमगार्ड मध्ये कामकरीत असुन तो गेल्या दोन वर्षा पासुन पोलिस भरती साठी प्रयत्न करीत आहे टेंभुर्णी पोलिसांच्या मनमानी मुळे दलीत कुठुंबांतील तरुणाचे उद्वस्त होण्याच्या मार्गावर असुन पोलिसांच्या बरोबरीने वेळोवेळी सेवा बजावणाऱ्या त्या होमगार्ड तरुणाचे पुढील आयुष्य बरबाद होऊ नये असे जनतेतून बोलले जात आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा