Breaking

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

*संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कन्हेरगाव येथे 128 जणांचे रक्तदान*


आ. संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कन्हेरगाव येथे 128 जणांचे रक्तदान.    

              

  टेंभुर्णी दि.  (प्रतिनिधी)   
करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कन्हेरगाव तालुका माढा येथे धनंजय मोरे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात  128  रक्तदात्यांनी रक्तदान केले.  पंढरपूर ब्लड बँकेने रक्त संकलित केले.              
           यावेळी  निमगांव टे चे सरपंच रविंद्र शिंदे,  शशिभाऊ शिंदे,बबनराव शिंदे प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र ठोंबरे,  सरपंच मनिषा चव्हाण,  हरितक्रांती पाणी पुरवठा चेअरमन किसन खोचरे, माजी  उपसरपंच धनंजय मोरे, कन्हेरगाव सोसायटी चे चेअरमन नागेश मोरे, सरपंच प्रतिनिधी दशरथ चव्हाण, पोलीस पाटील सदाशिव पाटील,  जगन्नाथ चट्टे,मुख्याध्यापक अमोल लोंढे, मुख्याध्यापक मोतीराम शिंदे,गणेश माने, विष्णू मोरे,  राजेंद्र केदार,निलेश ताटे,संजय डोके, संतोष कांबळे,संपत चव्हाण,अशोक लांडगे,माजी सरपंच उत्तम पाटील, संजय पाटील,सागर काकडे,देविदास डोके,सुनिल मोरे,प्रशांत डोके, आण्णासाहेब मोरे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कदम , तानाजी माने   ,बालाजी खोचरे, तानाजी पाटील, विकास टिंगरे  उपस्थित होते.कन्हेरगावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला पाण्याचा जार भेट देण्यात आला.  फोटो  ओळी   .                            रक्तदान शिबीरात निमगांव चे सरपंच रविंद्र शिंदे, शशिभाऊ शिंदे, धनंजय मोरे,  आदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा