Breaking

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

*टेंभुर्णी येथिल कापड व्यापारी घळके यांचा संशयास्पद मुत्यू घातपाताची शक्यता ? टेंभुर्णी नागरिकांतून उलट-सुलट चर्चा*





******** जाहीरात ******



------------------------------------------ 

आपल्या परीसरातील जाहीरतीसाठी संपर्क साधा मो. 9921581001*




ब्रेकिंग न्युज टेंभुर्णी 


टेंभुर्णी येथिल चांदनी चौकात असलेल्या याच दुकान मयत अढळून आल्याचे पहानी करताना टेंभुर्णी पो.नि.राजकुमार केंद्रे साहेब व पोलिस स्टाप .

टेंभुर्णी येथिल कापड व्यापारी घळके यांचा संशयास्पद मुत्यू घातपाताची शक्यता ? टेंभुर्णी नागरिकांतून उलट-सुलट चर्चा*



मयत ,घळके

टेंभुर्णी [प्रतिनिधी ] टेंभुर्णी शहरातील चांदनी चौक  वृद्ध कापड विक्रेते बाळकृष्ण बलभीम घळके वय (वय ७० ) यांचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह त्यांच्याच दुकानात मिळून आल्याने  टेंभुर्णी शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे अज्ञात व्यक्तीने त्यांना अज्ञात कारणाने मारून दुकानास बाहेरून कुलूप लावून पोबारा केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

बाळकृष्ण घळके हे रविवारी रात्री घरी जेवण करून दुकानात झोपण्यासाठी गेले होते.सकाळी ते बराच वेळ घरी न असल्याने मुलगा औदुंबर याने दुकानात जाऊन पाहिले असता दुकानास बसहेरून कुलूप लावलेले होते.नंतर त्याने दुसऱ्या चावीने कुलूप काढून आत पाहिले असता बाळकृष्ण घळके (वय-७०) रा.अकलूज रोड टेंभुर्णी हे दुकानात बिछान्याच्या आतल्या जागेत मृत अवस्थेत दिसून आले होते.या ही खबर सर्वत्र पसरल्याने लोकांनी एकच गर्दी केली होती.
मृत बाळकृष्ण घळके यांच्या डोक्यात कमरेवर जखम असून डाव्या हातास भाजलेले दिसत होते.तसेच त्यांच्या अंगावर कपडेही नव्हते.अंगात फक्त बनियन होता.यामुळे घळके यांचा मृत्यू संशयास्पद असून त्यांचा मृत्यू कशाने झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात मयताच्या माहिती मिळताच टेंभुर्णी  पोलिसानी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून दाखल केला आहे.
तेथे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे,सपोनि अमित शितोळे यांनी मृतदेहाची पाहणी केली आसुन 
बाळकृष्ण घळके यांच्या पश्चात पत्नी तीन मुले असून ते सतत दुकानातच असत.ते फक्त रात्री जेवण करण्यासाठी व सकाळी अंघोळ करण्यासाठी घरी येत असत.घळके यांच्या मृत्यू बद्दल संशय व्यक्त करण्यात येत असून हा घात पातीचा प्रकार आहे की आणखी काय याबाबत लोकांत चर्चा सुरू आहे.
अद्याप टेंभुर्णी पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल झालेला नसुन दाखल करण्याचे काम सुरु आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा