सापडण्याचे युवानेते सागर राजे ढवळे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या परिसरातील जाहिरातीसाठी संपर्क करा मोबाईल नंबर 99 21 58 1001
दहा वर्षाखालील लहान मुलांची वाढदिवस जाहिरात फक्त 251 रुपयात लहान मुलांची जाहिरात वाढदिवसाच्या अगोदर एक दिवस देणे गरजेचे
*********************advt *************
बेंबळे हद्दीत कोरोनाची लागण.... सहा व्यक्ती कोरोना पॉझिटिव
*******----****************--*******************
बेंबळे। प्रतिनिधी मुकुंद रामदासी
*aj24taas news mharastr*
मागील पाच महिन्यापासून बेंबळे गावाच्या चार दिशांना, सीमेलगत आलेल्या कोरोनाने अखेर बेंबळे गावच्या हद्दीत प्रवेश केला असून 15 ऑगस्ट रोजी 2 तर 16 ऑगस्ट रोजी चार व्यक्ती कोविड पॉझिटिव आलेल्या आहेत.
वृत्तांत असा की बेंबळे गावाची लोकसंख्या अकरा हजार असून तीन किलोमीटर परिसरात भोसलेवाडी, हरिनगर, काळेवस्ती, हुंबे वस्ती हा भाग येतो. यातील हरी नगर येथे 15 ऑगस्ट रोजी दोन संशयित आजारी व्यक्तींची तपासणी केली असता त्या दोन व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह आल्या., त्यांच्यावर सोलापूर येथे उपचार चालू आहेत. तर भोसले वाडी येथील संशयास्पद चार व्यक्तींची तपासणी केली असता या चारही व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह दिसून आले आहेत, त्यांना कुर्डूवाडी येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मागील पाच महिन्यापासून बेंबळे च्या सभोवताली सात ते आठ किलोमीटरच्या परिसरात घोटी, परिते, कान्हापुरी, अकोले बुद्रुक व मिटकलवाडी या शेजारच्या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.असे असुनही बेंबळे गावात अनेक नागरिक दररोज बेफिकीरपणे गावातून फिरतात, कुणी सांगितलं तर ते ऐकत नाहीत. एकत्र बसणे, गप्पा मारणे, गर्दी करणे, पत्ते खेळणे तीन तीन व्यक्ती मोटरसायकलवर बसून फिरणे ,दारूच्या अड्ड्यावर गर्दी करणे हे सर्रास प्रकार गावात दिसून येत आहेत. पोलीस पाटील किंवा अन्य सुज्ञ नागरिकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीची टर उडवली जाते किंवा उद्धटपणे त्या व्यक्तीशी बोलले जाते. परंतु आता मात्र गावच्या हद्दीतच कोरोना आल्यामुळे बेंबळे गावसाठी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला योग्य तो कडक निर्णय घ्यावाच लागेल कारण कोरोना पाँजिटिव्ह आलेल्या व्यक्तींचा बेंबळे गावाशी दैनंदिन संपर्क आहे हे निश्चित.
पोलीस पाटील बिभीषण किर्ते ,तलाठी डीआर नरळे, ग्रामसेवक मधुकर माने, शहाजी हुलगे या सर्वांनी हरीनगर व भोसले वाडी येथे कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे तसेच तेथील रस्ते सील करण्यात आलेले आहेत. परिते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉक्टर आरती भारती येथील सर्व प्रकारावर लक्ष देऊन आरोग्य सेवा बजावत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा