.
*राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना उपचारासाठी मंगळवारी मुंबईला हलविणार*
*कराड-प्रतिनिधी/ विशाल पाटिल*
कराड दि. 17 राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची तब्बेत व्यवस्थित आहे. परंतु त्यांना ब्लडप्रेशर व डायबिटीस असल्यामुळे पुढील उपचारासाठी
मंगळवारी (दि. १८) सकाळी साडेसात वाजता मुंबईला हलविले जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकारांना दिली .
आज कराड येथील कृष्णा रूग्णालयात राष्ट्रवादी पक्षाचे कराड उत्तर मतदार संघाचे आमदार व राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर कोविड पॉझिटीव्ह आल्याने उपचार सुरू आहेत. त्याच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी राजेश टोपे आले होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखरसिंह, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदिप वाकडे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील व हॉस्पिटलचे वैद्यकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा