*कुर्डुवाडी शहराचा "स्वच्छ सर्वेक्षणात" सोलापूर जिल्ह्यात प्रथम तर पश्र्चिम भारतात सदोतिसावा क्रमांक...*
*✒️कुर्डुवाडी विशेष बुलेटिन✒️*
*अरुण कोरे / प्रतिनिधी
*स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात कुर्डुवाडी नगरपालीकेने २०२० मध्ये सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली आहे.*
*त्याच प्रमाणे कुर्डुवाडी सारख्या क वर्ग नगरपालीकेत शहराने राज्यात २८ वा व संपूर्ण भारतात पश्चिम विभागात ३७ वा क्रमांक पटकावला आहे.*
*दोन वर्षांपूर्वी स्वच्छ सर्वेक्षणात तीन व चार आकड्यांच्या रांगेत कुर्डुवाडी शहर होते.*
*गेल्या दोन वर्षांत कुर्डुवाडी न.पा.चे नगराध्यक्ष समीर मुलाणी, उपनगराध्यक्षा सौ.उर्मिला हरिदास बागल व तत्कालीन मुख्याधिकारी कैलास गावडे यांचे मार्गदर्शनाखाली माजी आरोग्य समिती सभापती सौ.नंदाताई वाघमारे व विद्यमान सभापती सौ.वनिता सातव यांनी न.पा.चे आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण,मुकादम सुरेश कदम, सहाय्यक मुकादम शिवाजी खवळे सर्व विभागांचे प्रमुख व कर्मचारी यांनी, तांत्रिक व यांत्रिक अडचणी असतानाही तोकड्या सफाई कामगारांच्या सहकार्याने शहर स्वच्छतेचे नियोजन केले.त्याचे फळ चालू वर्षात मिळाले.*
*नियोजन पूर्वक ओला-सुका कचरा,गांडुळ खत प्रोत्साहन,घर तेथे मोफत दोन बकेट,गटारी व पाण्याचा निचरा, साफसफाई, कचरा तेथे टॅंक्टर, कचरा नष्टीकरण, रोजच्या रोज सार्वजनीक संडासांचे सॅनेटायझेशन आदी योजना राबविण्यात आल्या.*
*त्यास नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे जिल्ह्यात कुर्डुवाडी न.पा.ने एक नंबरने आघाडी तर घेतलीच पण देशपातळीवरही दोन आकड्यावर मजल मारली.*
*प्रभारी मुख्याधिकारी कोल्हे व आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांनी सर्व शहरवासियांचे आभार मानून शहर स्वच्छतेची मोहीम अखंड चालूच ठेवण्याचे व शहर स्वच्छतेत हातात हात घालून आघाडी घेण्याचे आवाहन केले आहे.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा