धुळे येथील विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेदार्थ इंदापूर तालुका भा. ज. पा. युवा मोर्चा तर्फे तहसिलदारांना निवेदन
इंदापूर प्रतिनिधी : शिवाजी पवार
धुळे येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते व विद्यार्थी यांच्यावर जो अमानुष हल्ला झाला त्या संदर्भात इंदापूर तालुका भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा यांच्या वतीने तहसीलदार सोनाली मेटकरी यांना निवेदन सादर करण्यात आले.
भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या आवाहनानुसार व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा युवा मोर्चा इंदापूर यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
या वेळी भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मा. रामभाऊ अासबे म्हणाले की महाविकास आघाडी चे मंत्री विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर व महाराष्ट्रातील सर्व स्तरातील प्रश्नांना केराची टोपली दाखवत आहेत, या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर व त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री उदय सामंत यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावेत व जो विद्यार्थांवर जो अमानुश हल्ला झाला त्यांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली.
या वेळी भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष शरदजी जामदार, जिल्हा सचिव तानाजी थोरात, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ आसबे, जिल्हा कार्यकारणी सदस्य हर्षवर्धन कांबळे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष गणेश भांडवलकर, सरचिटणीस सचिन सावंत, प्रेमकुमार जगताप, व इंदापूर सह जिल्ह्यातील युवा मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा