*जिजाऊ ब्रिगेड इंदापूर तालुका अध्यक्षपदी राधिका शेळकेची निवड*
------------------------------------------
इंदापूर प्रतिनिधी: शिवाजी पवार
------------------------------------------
*इंदापुर दि, 29
जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाणे यांच्या सुचने नुसार पुणे ( पुर्व ) जिल्हाअध्यक्षा प्रा. जयश्री गटकुळ मॅडम यांनी कोरोनाचा संसर्ग इंदापूर शहरात व ग्रामीण भागात फार मोठ्या प्रमाणात वाढत असलेमुळे सोशल डीस्टींगशचे पालन व्हावे व कोणालाही ञास होऊ म्हणुन शिवभक्त सौ. राधिका निवास शेळके यांची पञाद्वारे इंदापूर तालुका अध्यक्षपदी नेमणुक केलेली अाहे.
यावेळी राधिका शेळके बोलताना म्हणाल्या की जिजाऊ ब्रिगेड संघटच्या वरीष्ठांनी माझ्या वरती जो विश्वास टाकुन जी तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली अाहे. त्या विश्वासास पाञ राहुन माझ्या परीने महिला सक्षमी करण्यासाठी प्रयत्न करणार असुन ग्रामीण भागातील युवतींना शिक्षणासाठी व रोजगारासाठी ज्या-ज्या अडचणीचा सामना करावा लागतो परंतु त्यांना कोणाचाहि अाधार मिळत नाही. परंतु येथुन पुढे मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड महिला संघटने मार्फत अाधार देऊन महिला व मुलींच्या सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार अाहे. तसेच ग्रामीण भागातील महिलांचे नविन बचत गट वाढवुन उद्योग वाढीसाठी मदत तसेच प्रशिक्षण शिबीरे घेऊन त्यांना सक्षम बनविणार अाहे.
इंदापूर नगरपालीकेचे गटनेते मा. कैलासजी कदम, काॅंग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष मा. स्वप्निल भैय्या सावंत, काॅग्रेसचे इंदापूर शहर अध्यक्ष तानाजीराव भोंग, जिजाऊ ग्रुप हडपसर व इंदापूर तालुक्यातील संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी पुढील वाटचालीस हाद्रिक शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा