Breaking

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

टेंभुर्णी शहरात चार कोरोना पॉझिटिव्ह तर परीते,सुर्ली एक-एक रुग्ण


टेंभुर्णी शहरात चार  कोरोना पॉझिटिव्ह तर परीते,सुर्ली एक-एक रुग्ण


------------------------------------------ 
*बारवे मळा परिसर सिल केला आहे*
------------------------------------------ 


[aj24taas news mharastr ]

टेंभुर्णी [प्रतिनिधी ]  दि.14
 टेंभुर्णीत शहरात कोरोनाचा शिरकाव वाढत असुन गेल्या आठ दिवसापुर्वी  प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक नर्स आणि फार्मासिस्ट अशा दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली होती.यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.यामुळे प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तो भाग सील केलेला आहे.
आज परीते प्राथमिक आरोग्य केंद्रात 
टेंभुर्णी येथिल बारवे मळा येथे राहणारे   राहणारे दोघे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने टेंभुर्णी शहरात खळबळ उडाली असुन यामध्ये वडील व मुलगा असे रुग्ण आहेत.वडील हे टेंभुर्णी शहरातुन बायपास सोलापुर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कुर्डूवाडी रोड ब्रिज जवळ असलेल्या एका हॉटेल  मध्ये काम करीत होते.तेथे कोरोना संसर्गाची लागन झाली असल्याची शक्यता आहे.त्यांना 
गेल्या आठ दिवसापासुन खोकला,ताप,सर्दी असल्यामुळे घरी होता. त्यांना दोन दिवसापुर्वी परीते प्रथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारा साठी नेण्यात आले होते.त्या ठिकाणी कोरोना चाचणी घेतली असता त्यांचा रिपोर्ट शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आला असुन वडीला बरोबर मुलाची ही त
टेस्ट घेतली असता तो ही कोरोना पॉझिटिव्ह आला असुन तो टेंभुर्णी शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करीत होता.त्यामुळे टेंभुर्णी शहरात कोरोना पॉझिटिव्ह वाढण्याची शक्यता आहे.
आता टेंभुर्णी शहरात एकुन चार कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे त्या बरोबर टेंभुर्णी-पंढरपूर रोडवर आसलेल्या परीते येथे ही एक कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे तर टेंभुर्णी जवळस असलेल्या सुर्ली येथे ही काल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहीती प्रशासनाकडून मिळाली असुन आज टेंभुर्णी शहर पोळा सनामुळे  गर्दी वाढली होती बारवे मळा येथे दोन सापडल्याने टेंभुर्णी पोलिस स्टेशन व  टेंभुर्णी सरपंच प्रमोद कुटे,ग्रामपंचायत सदस्य गणेश केचे, व कर्मचारी यांनी बारवेमळा दोनशे मिटरचा परीसर सील केला असुन या भागात फवारणी करुण घेतला आहे.हे दोन्हीही पॉझिटिव्ह कुर्डूवाडी कोविड सेंटरला उपचारासाठी दाखल केले आहे.

------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा