Breaking

रविवार, १३ सप्टेंबर, २०२०

मराठा क्रांती मोर्चाचा इंदापुर मध्ये पुन्हा एल्गार* AJ 24 Taas News Maharashtra

*मराठा क्रांती मोर्चाचा इंदापुर मध्ये पुन्हा एल्गार*            


इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार
AJ 24 Taas News Maharashtra

 इंदापूर पासुन जवळच अासलेल्या सरडेवाडी येथील अथर्व लॉन्स याठिकाणी मराठा क्रांती मोर्चा ची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणात दिलेली स्थगिती संबंधी चर्चा झाली बैठकीतील चर्चेमध्ये युवकांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या. या बैठकीत मराठा मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगिती मुळे मराठा समाजाच्या मुलांच्या शैक्षणिक प्रवेश व नोकरी यासंबंधी निर्माण झालेल्या प्रश्नावरती सखोल चर्चा करण्यात अाली. अनेकांनी यासंबंधी अापल्या तीव्र भावना व्यक्त केल्या यावेळी बहुसंख्य लोकांनी आपले मत व्यक्त करताना महाराष्ट्र शासनाने यासंबंधी तातडीने पावले उचलून आरक्षणाची बाजू स्पष्टपणे न्यायालयात मांडावी दिलेली स्थगिती संबंधी फेरविचार याचिका दाखल करण्यात यावी. योग्य व कार्यक्षम कायदेतज्ञ यांची नेमणूक करण्यात यावी मराठा आरक्षण या विषयावर राजकारण न करता विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांनी एकत्र येऊन भूमिका मांडावी मराठा आरक्षण मराठा समाजाची महत्त्वाची बाब असून मराठा आरक्षणास स्थगिती मिळाल्यामुळे प्रगतीला अडथळा निर्माण होणार आहे. सरतेशेवटी विचार व्यक्त करताना सर्वांनी एकमुखाने असे आवाहन केले की शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणा संबंधित दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी तसेच महाराष्ट्र शासनाने तातडीने वटहुकूम काढून पुन्हा पूर्वीप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे सर्वांच्या वतीने आव्हान करण्यात आले. जर हे असे झाले नाही तर मराठा सकल समाज पुन्हा एकत्र येऊन पुन्हा क्रांती मोर्चे काढणार आहे. व पुन्हा मराठ सकल समाजातर्फे रस्त्यावरची लढाई लढणार   असल्याचेही या बैठकीमध्ये ठरवण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा