Breaking

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

बेंबळे सत्ताधारी गटात दुफळी ग्रामपंचायत सदस्यचा राजीनामा..* *माढा तालुक्यात राजकीय वर्तुळात खळबळ**AJ 24 Taas News Maharashtra*

*बेंबळे  सत्ताधारी गटात दुफळी ग्रामपंचायत   सदस्यचा राजीनामा..* *माढा तालुक्यात राजकीय वर्तुळात खळबळ*

*बेंबळे प्रतिनिधी:-सचिन शिंदे*
*AJ 24 Taas News Maharashtra*

बेंबळी प्रतिनिधी  दि.बेंबळे ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाच्या सदस्या जयश्री पोपट काळे यांनी आपला ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा सरपंच सौ. शितल किशोर कदम यांच्याकडे सुपूर्द केला. यामुळे बेंबळेच्या राजकीय वर्तूळात खळबळ माजली आहे.

विमलेश्वर विकास आघाडीच्या बैठकीत गटप्रमुखाकडून  जयश्री काळे यांना नऊ महीने सरपंच पद देण्याचे अश्वासन दिले होते. परंतु सदर अश्वासनाची पूर्ती न केल्यामुळे नाराज 

जयश्री काळे यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सध्यस्थितीला विमलेश्वर विकास आघाडी गटाचे बेंबळे गटावर वर्चस्व आहे. . जयश्री काळे यांच्या राजीनाम्याने सत्तेत कोणताही बदल होणार नसला तरी आगामी येवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीवर याचे पडसाद सत्ताधरी गटाला दिसू शकतात. १५ सदस्य रचना असलेल्या बेंबळे ग्रामपंचायतीची मुदत 23 नोव्हेंबर २०२० रोजी संपणार आहे. 

********************************
कोट 
" *ग्रामदैवत विमलेश्वरासाक्ष दिलेला शब्द गटप्रमुखाकडून पाळला गेला नसल्यामुळे मी राजीनामा दिला आहे*."

*सौ. जयश्री काळे माजी ग्रामपंचायत सदस्य बेंबळे*

*******************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा