*मराठा आरक्षण कायम ठेवून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लाभ मिळवून द्या.-- मराठा सेवा संघ नांदेड*
*******************************
*नांदेड प्रतिनिधी/बालाजी सिरसाट*
*AJ 24 Taas News Maharashtra*
दि.९-सप्टेंबर-२०२० रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण याचिका पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग करतांना आरक्षणाच्या अंमलबजावणीस (शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१) स्थगिती दिलेली आहे.हा निर्णय संपूर्ण मराठा समाजासाठी दुर्दैवी असून आरक्षणाच्या बाबतीत समाजाच्या मागण्या अतिशय तीव्र स्वरूपात आहेत.कोरोना महामारीमुळे लांबलेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये वरिष्ठ महाविद्यालयातील पदवी पदव्युत्तर व इंजिनिअरिंग आणि इतर तंत्रशिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आरक्षण कायम ठेवून मराठा विद्यार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा.यासाठी मराठा आरक्षणाच्या बाबतीत मागण्यांचे निवेदन मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड नांदेडच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत यांना देण्यात आले...
तरी मराठा विद्यार्थ्यांसाठी असलेले आरक्षण सुरू ठेवून प्रलंबित न्याय प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याची दक्षता घ्यावी...
यावेळी मराठा सेवा संघाचे तेलंगणा प्रभारी डॉ.गणेश शिंदे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ.पंजाब चव्हाण जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर,श्यामसुंदर शिंदे सचिव सतीश जाधव,रमेश पवार कार्याध्यक्ष उद्धव सूर्यवंशी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा डॉ विद्या पाटील अरुणाताई जाधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा