Breaking

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

सलगरा दिवटी येथील माजी सैनिक सदाशिव माळी यांचे १६ सप्टेंबर रोजी कोरोनामुळे निधन



सलगरा दिवटी येथील माजी सैनिक सदाशिव माळी यांचे १६ सप्टेंबर रोजी कोरोनामुळे निधन

सलगरा दि. - (प्रतिनिधी)

  
 माजी सैनिक सदाशिव वाघमारे (माळी) वय वर्ष ५५ यांना १० सप्टेंबर रोजी  उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे दाखल करण्यात आले होते. व १२ सप्टेंबर रोजी त्यांचा कोरोना अहवाल  पॉझिटिव्ह आला होता, 
 दि. १६ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास काही तासांपासून त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा नसल्या कारणाने उपचारा दरम्यान त्यांची  प्रकृती खालावली व अखेर त्यांची प्राणज्योत मावळली.
सदाशिव वाघमारे (माळी) यांच्या पश्चात
पत्नी, चार मुली व एक मुलगा असा परिवार आहे 

माजी सैनिक सदाशिव बाबुराव वाघमारे (माळी), सलगरा दिवटी यांचे  दिनांक १६ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने त्यांच्या या निधनाने सलगरा दिवटी गावावर शोककळा पसरली आहे,
म्हणुन त्या अनुषंगाने दिनांक १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी  ७:०० वाजण्याच्या सुमारास भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक सलगरा येथे  गावातील माजी सैनिक, सैनिक व प्रतिष्ठित नागरिक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला होता. या वेळी
माजी सैनिक दिलीप मुळे, सैनिक विक्रम लोमटे, सैनिक श्रीकांत गायकवाड, शाम माळी, धोंडिबा माळी, अरूण माळी, बालाजी राजगुरू, संतोष भरगंडे, युनूस शेख, औदुंबर लोमटे, आत्माराम सोनवणे व गावातील इतर ग्रामस्थांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा