रयत क्रांती संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुखपदी अमर पवार
टेंभुर्णी प्रतिनिधी AJ 24 Tass News Maharashtra
टेंभुर्णी : - रयत क्रांती संघटनेच्या माढा तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी येथील अमर दत्तात्रय पवार यांची निवड करण्यात आली आहे.
माजी राज्यमंत्री आ.सदाभाऊ खोत यांच्या आदेशानुसार टेंभुर्णीत रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष दिपक भोसले व जिल्हा समन्वयक प्रा.सुहास पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी अमर पवार यास नियुक्ती पत्र देन्यात आले.यावेळी विविध पदावरील नियुक्त्या करण्यात आल्या.यावेळी शेतकर्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचे आव्हान केले गेले.या निवडीनंतर अमर पवार यांनी आ.सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना मजबुत करून, छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्यकारभाराला व भारतीय राज्यघटनेला आदर्श मानुन,शेतकरी,शेतमजुर,कामगार, विद्यार्थी व इतर समाज घटकांच्या हक्कासाठी व सन्मानासाठी काम करण्याचे आश्वासन दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा