राजकुमार पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार
AJ 24 Tass News Maharashtra
अकोले खुर्द तालुका माढा येथील युवक नेते मा. राजकुमार दिलीपराव पाटील यांची नुकतीच सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रांतराव माने यांच्या शुभहस्ते श्री.राजकुमार पाटील यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
यावेळी यशोदिप पाटील, माढा तालुका राष्ट्रवादी किसान सभेचे उपाध्यक्ष अंबादास वाघमारे उपस्थित होते. या निवडीचे आमदार मा. बबनरावजी शिंदे, आमदार मा.संजयमामा शिंदे, जिल्हा परिषद सदस्य मा. रणजितसिंह शिंदे, पंचायत समितीचे सभापती मा. विक्रमसिंह शिंदे यांनी राजकुमार पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
राजकुमार पाटील यांनी सोलापूर जिल्हा कृषी आत्मा कमिटीचे सदस्य, प्रधानमंत्री मुद्रा लोण कमिटीचे सदस्य , शरदचंद्र पवार प्रतिष्ठान अध्यक्ष म्हणून काम केलेले असुन त्यांना कामाचा दांडगा अनुभव असले मुळेच पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली अाहे. त्याच्या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्यतील तरुण वर्ग खुष झाला अाहे व यापुढे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात पक्षसंघटना वाढविणेसाठी अा. बबनदादा शिंदे व अा. संजयमामा शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार असलेचे पाटील म्हणाले.
.
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजकुमार पाटील यांचा सत्कार करताना सिद्धेश्वर काळभोर सद्दाम पटवारी यशोदीप राजकुमार पाटील कॉन्ट्रॅक्टदार रमेश जाधव वडार समाजाचे नेते सतीश मासुळे अक्षय शिंदे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा