Breaking

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०

राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांतून इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात ३९ ऑक्सिजनयुक्त बेडची जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिपदादा गारटकर यांनी प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत केली पाहणी * AJ 24 Tass News Maharashtra



*राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांतून इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात ३९ ऑक्सिजनयुक्त बेडची जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिपदादा गारटकर यांनी  प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत केली पाहणी *

इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार AJ 24 Tass News Maharashtra

   इंदापूर दि.08   राज्यमंत्री  सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  दत्तात्रय ( मामा)भरणे यांनी जिल्हाधिकारी  राजेंद्र देशमुख यांच्यासह सर्वच विभागाच्या प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत झालेल्या आढावा बैठकीप्रसंगी कोविड सेंटरमधिल अडी अडचणी जाणून घेतल्या होत्या.सदर मिटींगमध्ये सर्वसामान्य रूग्णांना येत असलेल्या अडचणी तात्काळ दूर होव्यात या अनुषंगाने नामदार  भरणे मामा यांनी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक ऑक्सिजनयुक्त ३९ बेड तसेच १० व्हेंटिलेटर रूग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी संसाधने २४ तास उपलब्ध केली
 असल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुहास शेळके यांनी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष  प्रदिपदादा गारटकर, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक  मधुकरमामा भरणे, यांना उपजिल्हा रुग्णालयात पाहणी करताना दिली.


        यावेळी इंदापूर तालूक्याच्या तहसिलदार सोनाली मेटकरी,तालूका आरोग्य अधिकारी डॉ महाजन, माजी नगराध्यक्ष श्री विठ्ठलराव ननवरे, माजी नगराध्यक्ष सुधिर मखरे, शहराध्यक्ष  अनिल राऊत, नगरसेवक अमर गाडे, प्रवीण दादा सोनवने,  पोपट शिंदे मखरे,  मुकुंद साळुंके यांच्यासह उपजिल्हा रूग्णालयातील आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा