दहिवडी येथील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे धडे
Aj 24Taas News Maharashtra
सलगरा दिवटी - प्रतिनिधी, प्रतिक भोसले
दहिवडी - डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी संलग्नित व श्री साई जनविकास प्रतिष्ठान संचलित कृषि महाविद्यालय आळनी (गडपाटी) उस्मानाबाद येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम व कृषी आधारित उपक्रम कार्यक्रम प्रियदर्शनी अंबुरे या विद्यार्थिनीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून कु. प्रियदर्शनी शरद अंबुरे या विद्यार्थिनीने शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन केले.
ग्रामीण जागरूकता कार्यक्रम व कृषी आधारित उपक्रम या कार्यक्रमाअंतर्गत दहिवडी परिसरातील शेतकऱ्यांना जिवामृत कसे तयार करावे याचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य बी. बी. दंडनाईक व कार्यक्रमाचे अधिकारी के. बी. थोरात उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा