Breaking

बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

प्रशासन व लोणंदकरांच्या सहकार्याने शहरातील संकलित केलेल्या गणेश मूर्तीचे निरा नदीच्यापात्रात विसर्जन




प्रशासन व लोणंदकरांच्या सहकार्याने शहरातील संकलित केलेल्या गणेश मूर्तीचे निरा नदीच्या
पात्रात विसर्जन 

खंडाळा प्रतिनिधी/सुशिल गायकवाड.
*AJ24Taas News Maharasta*

सध्या सर्वत्र कोरोना रोगाची भयान परिस्थिती असल्याने
अनंत चतुर्दशीला विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी खंडाळा तालुक्यातील लोणंद नगरपंचायत आणि लोणंद पोलीस ठाणे यांच्या वतीने लोणंद।शहरातील विविध ठिकाणी संकलन केंद्रात गणेश मूर्ती ही दान करण्यास लोकांना आवाहन करण्यात आले होते.गणेश मुर्त्या एकत्रितरित्या संकलित करून विसर्जन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.त्याच पार्श्वभूमीवर गणेश भाविकांनी या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत आपल्या घरातील बसविलेले गणपती व गणेश मंडळांनी गणेश मूर्ती ही संकलन केंद्रात देऊन प्रशासनास सहकार्य करीत गणरायाला अखेरचा निरोप दिला.एकत्रित केलेल्या गणेश मूर्ती यांचे विसर्जन उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे,लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी 
हेमंत ढोकले ,लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी,लोणंद नगरीचे नगराध्यक्ष सचिन शेळके-पाटील, विरोधी पक्षनेते राजेंद्र डोईफोडे यांच्या सह भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या स्वयंसेवकांच्या उपस्थितीमध्ये निरा नदीच्या पात्रात दत्त घाट या ठिकाणी करण्यात आले.यावेळी लोणंद येथील भैरवनाथ डोंगर ग्रुपचे नेमलेले स्वयंसेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.मूर्ती संकलित करण्यापासून ते मूर्ती विसर्जित करण्यापर्यंत या स्वयंसेवकांकडून प्रयत्न करण्यात आले.अगदी आनंदमय वातावरणात विधीवत पूजा करून, गणरायाची एकत्रित आरती म्हणत श्री गणरायाला निरोप देत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करण्यात आला.लोणंद नगरपंचायत, लोणंद पोलीस स्टेशन,भैरवनाथ डोंगर ग्रुप यांच्या मार्फत कोरोना संकट काळात प्रसार रोखण्यासाठी अगदी चांगल्या नियोजनातून गणपती बाप्पा मूर्तीचे एकत्रित विसर्जन करण्यात आल्याने लोणंद शहरातील लोकांकडून या बद्दल कौतूक केले जात आहे.सर्व लोणंदकरांच्या रूपाने गणरायाची सेवा करता आल्याने याबाबत नगरपंचायत प्रशासन, पोलीस प्रशासन व डोंगर मॉर्निंग ग्रुप यांनी विशेष समाधान व्यक्त केलेले आहे.




-लोणंद पोलीस ठाण्याची गणेश मूर्ती संकलन केंद्रास सपोनि संतोष चौधरी यांच्या हस्ते देण्यात आली.

-निरा नदीच्या पात्रात लोणंद मधील संकलित केलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी आरती करण्यात अली 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा