ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
*AJ 24 Taas News Maharashtra
टेंभुर्णी प्रतिनिधी /सदाशिव पवार*
टेंभुर्णी : - ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सीमा सतीश भानवसे या विद्यार्थ्यांनीने शिराळ (टें) येथील शेतकऱ्यांना शेती विषयक माहिती त्यांच्या बांधावर जाऊन दिली.
कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी सीमा भानवसे हिने शास्त्रीय पद्धतीने कशी शेती करावी,माती परिक्षण,फळबाग पिकावरील कीड व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करून माती परिक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखविले.यावेळी शेतकरी,सरपंच उमाबाई केंदळे,ग्रामसेवक नवनाथ दौंड हे उपस्थित होते.त्यांना महाविद्यालयाचे डॉ.पी.एन.रसाळ,डॉ.एच.आर.शिंदे,वनस्पतीशास्त्र विभागाचे समन्वयक डॉ.बी.टी. कोलगणे यांचे मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा