Breaking

शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

*भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वतीने महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान**

.

*भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वतीने महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान*
*AJ24Taas News Maharashtra*
टेंभुर्णी (प्रतिनिधी )भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा टेंभुर्णी शहराच्या वतीने टेंभुर्णी येथे वैश्विक महामारी covid-19 च्या प्रकोपाच्या संकट कालावधीमध्ये केलेल्या विशेष कार्याची दखल घेऊन नुकताच माढा तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला होता त्याच बरोबर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रशासनातील काही कर्मचारी रात्रंदिवस कष्ट करतात त्यामुळे चव्हाणवाडी व टेंभुर्णी येथील महसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा *सेवा संकल्प* हे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला याच बरोबर सर्वअधिकारी वकर्मचाऱ्यांना सॉनीटायझर व मास्क भेट स्वरूपामध्ये देण्यात आले .

यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे माजी जिल्हा उपाध्यक्ष व चव्हाण वाडी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष बापू इंदलकर यांनी महसूल प्रशासना विषयी कृतज्ञता व्यक्त करत आपले मत मांडले 
या कार्यक्रमासाठी  टेंभुर्णी येथील प्रसिद्ध उद्योजक शिवाजी भाऊ गोंदील टेंभुर्णी ग्रामपंचायतचे उपसरपंच धनंजय नाना गोंदील ,भाजपाचे तालुका उपाध्यक्ष  औदुंबर भागवत,भारतीय जनता पार्टी टेंभुर्णी शहर अध्यक्ष डॉ.सयाजी देशमुख,भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष शंकर सुक्रे,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे शहर सचिव महेश अवसलकर,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर कार्याध्यक्ष प्रकाश देवा हिंगमिरे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर चे कार्यकारणी सदस्य सुदर्शन दादा ढगे ,संभाजी उर्फ शंभू पवार लखन माने ,प्रवीण भैया कदम, अजय कोकाटे ,मंगेश कदम, प्रीतम काशीद ,गोपाल चव्हाण ,अतुल चव्हाण,सादिक भाई ,तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय भाऊ कोकाटे व भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस अविनाश दादा धोत्रे यांनी केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा