*जगदीश अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त 103 रक्तदात्यांनी केले रक्तदान*
*अतुल वारे पाटील-करमाळा*
भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 27 ऑक्टोबर रोजी करमाळा येथील दत्त मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
यामध्ये सुमारे 103 रक्तदात्यांनी रक्तदान करत जगदीश अग्रवाल यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विठ्ठलरावजी भणगे, करमाळा नगरपालिकेचे नगरसेवक महादेव फंड, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दीपक चव्हाण,युवा मोर्चा शहराध्यक्ष संदीप जाधव आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
या रक्तदान शिबिरात अनेक कार्यकर्ते ,मित्रपरिवार, शहरातील नागरिक व महिला मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
या रक्तदान शिबिरात 100 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला.
तसेच गरजूंना मोठ्या प्रमाणावर अन्नदानही करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती शेखर गाडे, पंचायत समिती उपसभापती दत्तात्रय सरडे, जिल्हा परिषद सदस्य बिभीषण आवटे, नगरसेवक सचिन घोलप, अतुल फंड, अमरजीत साळुंखे, नितीन आढाव , सचिन चव्हाण , विजय लावंड,सचिन क्षिरसागर, अमित जागते,पत्रकार अतुल वारे पाटील, गणेश जगताप, सचिन जव्हेरी विशाल घोलप,सचिन आबा कणसे,रविराज पटाडे, दिनेश पंडित,मिलिंद माने, भैया राजमाने ब्रिजेश देवी, प्रेमसिंग परदेशी, रोहन माने आदी जणांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
सोलापूर येथील अक्षय बँकेने रक्तसंकलन केले.
वाढदिवसानिमित्त केलेल्या या सामाजिक कार्यक्रमांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. जगदीश अग्रवाल यांनी सर्व रक्तदात्यांचे तसेच विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा