कै.नारायणराव पाटील सोळंके बहुउद्देशिय सेवा भावी संस्था डोंगरगाव संचलित,व्यायाम शाळेचे उद्घाटन...
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
माळकोल्हारी येथे दिनांक 25 सप्टेंबर रोजी किनवट तालुका एकात्मिक आदिवासी प्रकल्प स्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष भगवान हुरदुके यांच्या हस्ते व्यायाम शाळेचे उद्घाटन संपन्न झाले.
किंनवट सारख्या आदिवासी व ग्रामीण भागात युवकांना शारीरिक विकास व्हावा व त्यांच्यामध्ये जिद्द व चिकाटी निर्माण व्हावी या भावनेने कैलासवासी नारायणराव पाटील सोळुंके बहुउद्देशीय सेवाभावी संस्था डोंगरगाव चे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील सोळुंके यांनी या व्यायाम शाळेचा निर्मिती केली या व्यायाम शाळेचे उद्घाटन आज भगवान हूरदुके यांच्या हस्ते संपन्न झाले संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील सोळुंके यांनी भगवान हुरदुके ,पंचायत समिती सदस्य माधव डोकळे ,सरपंच तुकाराम कोकाटे, उपसरपंच गणेश आडे, डोंगरगाव चे पोलीस पाटील रमेश हुरदुके, पोलीस पाटील दत्ता डोईफोडे ,नामदेव चाकोते मारुती कंधारे, सुभाष खोकले ,धनवे गुरुजी यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार सुरेश पाटील सोळुंके यांनी केला.माळकोल्हारी येथे व्यायामशाळा काढून गावातील युवकांची व्यायामाचीसोय केली म्हणून यांच्या गावकऱ्याच्या वतीने सुरेश पाटील सोळंके यांचा सत्कार करण्यातआला .दसऱ्याच्या मुहूर्तावर हा व्यायाम व्यायाम शाळा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी माळकोलारी, बिल्लोरी धानोरा, सावरगाव तांडा, सावरगाव ,जलधारा तांडा ,जलधारा भंडारवाडी या परिसरातील युवकांनी आपली शरीरयष्टी मजबूत करण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील सोळंके यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूसाहेब तुपेकर यांनी केले या कार्यक्रमास दत्ता दहिफळे, आनंद सोनटक्के कोंडवा टारफे ,रामराव मोरतळे यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा