सातारा येथे कक्षाचे व 5 ऑक्सीजन मशीनचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण,
*
सातारा दि.13 (प्रतिनिधी) स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात आज तिसऱ्या आयसीयु बेड कक्षाची नव्याने निर्मिती करण्यात आली. कोविड रुग्णांसाठी असणाऱ्या या आयसीयुकक्षात 15 बेड असून याचे लोकार्पण आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. आर्ट ऑफ लिव्हींगच्यावतीने 5 ऑक्सीजन मशीन या कक्षाला देण्यात आल्या आहेत, याचेही लोकार्पण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात एकूण 2 आयसीयु कक्ष आहेत आज तिसऱ्या आयसीयु कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. हा कक्ष अत्याधुनिक उपकरणांसह रुग्णांच्या सेवेसाठी आजपासून सज्ज झाला आहे. या कक्षामार्फत रुग्णांना उपचार मिळणार आहेत.आर्ट ऑफ लिव्हींगने ऑक्सीजन मशीन दिल्याबद्दल जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आर्ट ऑफ लिव्हींगचे आभार त्यांनी मानले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी या कक्षाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
कराड तालुक्यात 73 बाधित वाढले.....
जिल्ह्यात काल रात्री आलेल्या अहवालात 242 जणांची वाढ झाली असून कराड तालूक्यात फक्त 73 जण बाधित वाढले आहेत, तर शहरात नविन 5 बाधितांची वाढ झाली आहे.सध्या जिल्ह्याचा बाधितांचा आकडा 42 हजार 76 झाला आहे, तर आजपर्यंत 33 हजार 871जण कोरोनामूक्त होऊन घरी गेले आहेत, तर 1381 जणांचा मृत्यू झाला आहे, 6 हजार 824 जणांवर सध्या विविध रूग्णालयात उपचार सूरू आहेत, आज पर्यंत जिल्ह्यात 1 लाख 64 हजार 293 जणांचे नमूने घेण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील 242 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 7 बाधितांचा मृत्यु
जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 242 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 7 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 4, मंगळवार पेठ 4, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 5, रविवार पेठ 2, गुरुवार पेठ 2, बुधवार पेठ 2, सदरबझार 9, देशमुख नगर 1, शाहुपुरी 11, पंताचा गोठ 1, मोळाचा ओढा 1, मल्हार पेठ 1, कोपर्डे 1, निनाम 3, बोरखळ 1, रेवडी 2, आर्वी 1, ढोंबरेवाडी 3, चिमणपुरा पेठ 1, संकल्प कॉलनी सातारा 1, गुजरवाडी 2, सालवाडी 1, पोवई नाका सातारा 1, अपशिंगे 1, राधिका रोड सातारा 1, करंजे पेठ 1, देगाव 1, जकातवाडी 1, अजिंक्य कॉलनी सातारा 1, यादव गोपाळ पेठ 1, काशिळ 1, अतित 1, वाढे 3, पाटखळ 1, सैदापूर 2, देगाव फाटा 1, वडूथ 1,
कराड तालुक्यातील कराड 12, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 2, विद्यानगर 1, कोयना वसाहत 2, आगाशिवनगर 3, शिवनगर 4, करवडी 1, सुपणे 1, वहागाव 1, केसे 2, तांबवे 1, सावदे 1, काळेवाडी 4, ओंडशी 1,कर्वे 6, मलकापूर 2, उंब्रज 2, अटके 5, बेलदरे 1, ओगलेवाडी 1, खराडे 1, गोंदी 1, सैदापूर 1, मसूर 3, कापिल 1, कांबीरवाडी 2, बेलवडे 1, सैदापूर 1, काले 2, रेठरे खु 2, कासार शिरंबे 1,कोळे 1, वाखण रोड 1,
फलटण तालुक्यातील मलठण 1, विद्यानगर 1, लक्ष्मीनगर 1, डीएड चौक 1, रविवार पेठ 1, फरांदवाडी 1, हिंगणगाव 1, बरड 1, जाधववाडी 5, सस्तेवाडी 1, वडजल 1, काळज 1, तरडगाव 1, झिरपवाडी 1, गिरवी 1, चौधरवाडी 2, जिंती नाका 1. वाई तालुक्यातील कवठे 1, बेलमाची 1, जांब 3, भुईंज 1, गंगापुरी 1, पाटण तालुक्यातील पाटण 1, मल्हार पेठ 1, हरगुडेवाडी 1, ढेबेवाडी 1, गारवाडी 1, चाफळ 1, मुद्रुळकोळे 1. खंडाळा तालुक्यातील अंबरवाडी 1, लोणंद 1, अहिरे 3, बोरी 1,
महाबळेश्वर तालुक्यातील मेन रोड पाचगणी 6. खटाव तालुक्यातील भोसरे 1, पडळ 1, जाखणगाव पुसेगाव 1, नागनाथवाडी 1, पुसेगाव 1, सिध्देश्वर कुरोली 1, नेर 4. माण तालुक्यातील बिजवडी 1, म्हसवड 1, मार्डी 1, कारखेल 1, टाकेवाडी 1, मलवडी 1, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, वाठार स्टेशन 3, एकसळ 1, दुघी 1, रुई 1, रहिमतपूर 1, सासुर्वे 1, वेळू 1, पिंपोडे 1, शेंदूरजणे 1, दुर्गलवाडी 1.
इतर वाठार कॉलनी 1, निगडी 1, माजगाव 1,
बाहेरील जिल्ह्यातील इस्लामपूर 2, शिराळा 1,
7 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेतलेल्या एकंबे ता. कराड येथील 75 वर्षीय पुरुष, कोंडवे ता. सातारा येथील 48 वर्षीय पुरुष, भक्तवाडी ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये कृष्णानगर ता. सातारा येथील 61 वर्षीय पुरुष, महतपुरा पेठ ता. फलटण येथील 42 वर्षीय महिला, जांब ता. खटाव येथील 78 वर्षीय पुरुष, हिंगणी ता. माण येथील 80 वर्षीय महिला अशा एकूण 7 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने --164293,एकूण बाधित --42076 ,घरी सोडण्यात आलेले --33871,मृत्यू --1381 ,उपचारार्थ रुग्ण- 6824
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा