Breaking

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०

टेंभुर्णीत राहुल गांधी यांच्यावरील हल्ल्याचा शहर काँग्रेसच्या वतीने निषेधAj 24 Taas News Maharashtraट



टेंभुर्णीत राहुल गांधी यांच्यावरील हल्ल्याचा शहर काँग्रेसच्या वतीने निषेध

Aj 24 Taas News Maharashtra
टेंभुर्णी प्रतिनिधी दि.
टेंभुर्णी : - देशाचे नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी हे हाथरस येथे पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना झालेल्या हल्ल्याचा  निषेध करीत टेंभुर्णी शहर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष सोमनाथ कदम यांच्या नेतृत्वाखाली टेंभुर्णी पोलिसांना निवेदन देण्यात आले.



खा.राहुल गांधी व प्रियांका गांधी हे उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेतील कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना झालेल्या हल्ल्याचा  टेंभुर्णी शहर काँग्रेसच्या वतीने निषेध केला.तसेच शुक्रवारी सकाळी केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारचा तिवृ निषेध करीत टेंभुर्णी पोलिस ठाण्यात पोलीस निरिक्षक राजकुमार केंद्रे यांच्याकडे निषेधाचे पत्र देण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष सोमनाथ कदम,जिल्हा सरचिटणीस रामभाऊ वाघमारे,माढा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष भाऊ वाघ,भीमराव बंडगर,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय पाटील,धनंजय मोरे,गोरख देशमुख,सुनील धोत्रे,ओबीसी सेलचे सचिन जाधव,बाबा धोत्रे,प्रशांत देशमुख,सुनील जगताप,सचिन कांबळे,सनी सोनवणे,रवि सोनवणे,रणजित खंडागळे,आप्पा जाधव,गणेश कांबळे,विकास सुर्वे हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा