Breaking

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०

अकोले-खुर्द येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट AJ 24 Taas News Maharashtra


अकोले-खुर्द येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट


टेंभुर्णी प्रतिनिधी/AJ 24 Taas News Maharashtra

टेंभुर्णी  : - माढा तालुक्यातील अकोले-खुर्द येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पूराने दलित वस्तीत व गावकुसात पाणी शिरून घरांचे,सामानाचे नुकसान झाले होते.या नुकसानग्रस्त भागास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.

यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले.यापूर्वी जि.प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी ही भेट दिली होती.त्यांना नुकसानग्रस्त व दलित समाजातील तरुणांनी निवेदन देऊन ओढ्याच्या पात्रात मोडतोड केल्यामुळे दलित वस्ती,हांडे गल्ली,मातंग गल्लीत पाणी घुसल्याचे म्हटले आहे.यामुळे संसारपयोगी साहित्य,कृषी दुकानाचे साहित्य,खते भिजून मोठे नुकसान झाले आहे.याची चौकशी करण्याची मागणी गोकुळ वाघमारे,सत्यवान हांडे,प्रवीण वाघमारे आदींनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा