Breaking

बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२०

*उत्तरप्रदेश हसरथ येथे झालेल्या अमानवीय कृत्याचा निषेध करण्यासाठी बार्शी येथे सर्व समाज व समविचारी संघटना यांची बैठक पार पडली* AJ 24 Taas News Maharashtra



*उत्तरप्रदेश हसरथ येथे झालेल्या अमानवीय कृत्याचा निषेध करण्यासाठी बार्शी येथे सर्व समाज व समविचारी संघटना यांची बैठक पार पडली*


 AJ 24 Taas News Maharashtra
बार्शी तालुका /प्रतिनिधी-


बार्शी दि. 07, उत्तरप्रदेश मधील हसरथ या ठिकाणी मनीष वाल्मिकी या मुलीवर सामूहिक बलात्कार करून अमानुषपणे तिची हत्या करण्यात आली व सरकारची या बाबत असणारी असंवेदनशीलता याचा निषेध म्हणून बार्शी येथे समविचारी पक्ष व संघटना यांच्याकडून तीव्र आंदोलन छेडण्यासाठी काल संध्याकाळी 6  वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी एक बैठक घेण्यात आली, यावेळी सर्व समाज बांधवांमधून सरकार विरोधात आक्रोश दिसून येत होता पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी यावेळी दिशा ठरविण्यात आली, यावेळी शुक्रवार दि 9/10/2020 रोजी बार्शी शहरात मोठ्या प्रमाणात जण आक्रोश आंदोलन छेडणार असल्याचे व रास्ता रोको करण्याचे या बैठकीतून निष्पन्न झाले असून यावेळी पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी सर्व समाज शुक्रवारी रस्त्यावर उतरणार असून शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा