बेंबळे ग्रामपंचायतीच्या २४ लाख रुपयांच्या विकास कामांना स्थगिती..
बंदीस्त गटारी फोडल्या, ग्रामस्थांची तिव्र नाराजी
बेंबळे। प्रतिनिधी। Aj 24Taas News Maharashtra
माढा तालुक्यातील बेंबळे गावच्या ग्रामपंचायतीकडून १४ व्या वित्त आयोगातून होत असणाऱ्या २४ लाखांच्या विकास कामांना गट विकास अधिकारी डॉ संताजी पाटील यांनी स्थगिती दिली आहे.
सविस्तर वृतांत असा, बेंबळे ग्रामपंचायतीकडून १४ व्या वित्त आयोगातून होत असलेली कामे अनुक्रमे, भूमिगत गटार काम निविदा रक्कम ५ लाख ९९ हजार ०८४ रूपये, आण्णा भाऊ साठे नगरातील समाज मंदीर दुरूस्ती काम निविदा रक्कम ५ लाख ९५ हजार ९६२ रूपये तर आंगणवाडी दुरूस्ती काम, कदम गल्ली व वडार गल्लीत रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच धुळदेव मंदीर पेव्हींग ब्लॉक बसवणे निविदा रक्कम १२ लाख ३४ हजार ६७४ रूपये असे एकूण तीन कामांच्या निविदांची एकंदरीत रक्कम २४ लाख २९ हजार ७२४ रूपयांची विकास कामे स्थगित ठेवण्यात यावीत असा आदेश देण्यात आला आहे.
सदराची कामे निकृष्ट दर्जाची व गरज नसताना शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचे बहुतांश नागरिकांचे म्हणणे आहे. यापैकी काही भागात सिमेंट काँक्रीटच्या चांगल्या मजबूत अशा बंदीस्त गटारी असताना त्या बुजवून त्या ठीकाणी ८ इंच आकाराच्या सिमेंट पाईप टाकण्यात आल्या आहेत. तसेच समाज मंदीराची फरशीसुध्दा सुस्थित होती फक्त ती फरशी उखडून त्या जागी नवी फारशी टाकण्यात आली आहे. हा सर्व वायफळ खर्च केवळ ग्रामसेवक व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना चरण्यासाठी कुरणे निर्माण करून १४ व्या वित्त आयोगाचा निधी हडप करण्याचा कट असल्याचे बेंबळे गावातील अनेक नागरिकांचे मत आहे. त्यामुळे बेंबळे गावातील विजय पवार, सोमनाथ भोजणे,व औदुंबर लोंढे यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे या कामाची माहीती दिली असता उपरोक्त कामांवर गटविकास अधिकारी यांनी कामांना स्थगितीचा आदेश दिला आहे.
बेंबळे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक मुदत २३ नोव्हेंबर २० या तारखेला संपत असल्याने निकृष्ट दर्जेची कामे करून निधी लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न ग्रामसेवक व ग्रामपंचायतीकडून होत असुन संपूर्ण गावाला फसवण्याचा प्रकार दिसून आहे. या सर्व प्रकारामुळे बेंबळे ग्रामपंचायतीकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराची चर्चा संपूर्ण माढा तालुक्यात होत आआहेफोट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा