Breaking

बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२०

ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन Aj 24Taas News Maharashtra




ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
       Aj 24Taas News Maharashtra





बेंबळे (प्रतिनिधी ): - ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत 
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणारा ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम यंदा स्वतःच्या गावातूनच राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने
गौरी बंडु आवताडे  या विद्यार्थ्यांनीने बेंबळे येथील शेतकऱ्यांना शेती विषयक माहिती त्यांच्या बांधावर जाऊन दिली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने बेंबळे येथे  पुणे येथील कृषी महाविद्यालयाचि कृषिकन्या गौरी अवताडे हिच्या कडून शेतकार्यांना वेगवेगळी माहिती दिली जात आहे. याचाच एक भाग म्हणून तिने गावातील प्रगतशिल बागायतदार श्री. विलास भोसले याच्याकडून शेतीच्या प्रगतीचे माहिती घेतली. 
विलास भोसाले यांचे ५० एकरातील पपई,केळी, पेरु,सिताफळ,द्राक्षे व ऊस आदी पिकांचे केलेले काटेकोरपणे नियोजन करुन   योग्य उत्पादन घेण्याचे कौशल्य याचा अभ्यास गौरी ने केला. व त्यांच्या कौशल्याचे ,अभ्यासपुर्ण नियोजनाचे संकलन करुन इतर शेतकऱ्यांना उपयोगात येईल असे  नियोजन केले.
पुणे येथील  कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी गौरी आवताडे हिने शास्त्रीय पद्धतीने कशी शेती करावी,माती परिक्षण,फळबाग पिकावरील कीड व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करून माती परिक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
त्यांना महाविद्यालयाचे डॉ.पी.एन.रसाळ,डॉ.एच.आर.शिंदे,वनस्पतीशास्त्र विभागाचे समन्वयक डॉ.बी.टी. कोलगणे यांचे मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा