Breaking

रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

*कामगार कर्मचारी संघर्ष युनियन , महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष पदी , जयश्री पाटील यांची निवड*AJ24TassNewsMaharashtra



*कामगार कर्मचारी संघर्ष युनियन , महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष पदी , जयश्री पाटील यांची निवड*



AJ24TassNewsMaharashtra
पुणे प्रतिनिधी बाळासाहेब कापरे

पुणे ,,प्रतिनिधी : -  दि.04
महाराष्ट्र राज्याच्या , महिला आघाडीच्या कामगार कर्मचारी संघर्ष युनियन च्या कार्याध्यक्षपदी , जयश्री  जगन्नाथ पाटील यांची ची निवड नुकतीच करण्यात आली . ही निवड कामगार कर्मचारी संघर्ष युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी मैनी यांचे मार्गदर्शनाखाली ,  कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पश्चिम महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियनचे महाप्रदेश अध्यक्ष नितीन (भाऊ) पाटील यांनी नुकतीच केली.
देशाच्या राष्ट्रीय पातळीवर कामगार कर्मचारी युनियन कार्यरत असून , संघटित व असंघटित कामगारांच्या बुलंद आवाज बनून , त्यांच्या सामाजिक व आर्थिक उन्नती साठी कामगार युनियन अतिशय जोमाने काम करत आहे. विविध अस्थापणामधिल असंघटित कामगार यांना एकत्र करून ,  त्यांना सक्षम व संघटित करून , राज्य व केंद्र सरकारने दिलेल्या सवलती सर्व स्तरापर्यंत पोहोचविण्याचे काम हे या संघटनेचे वैशिष्ठ्य आहे.
जयश्री पाटील यांनी आज पर्यंत पुणे जिल्ह्याच्या अनेक विविध समस्या व इतर कामे अगदी मनापासून , पुढाकार घेऊन विविध संघटनांची बांधी केलेली आहे. याच कामाची पोहोच पावती म्हणून नितीन भाऊ पाटील यांनी जयश्री पाटील यांची निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगितले.
कामगार कर्मचारी संघर्ष युनियन च्या पश्चिम महाराष्ट्र  महिला आघाडीच्या आघाडीच्या कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जयश्री पाटील यांनी आतापर्यंत तीस ते चाळीस वर्षे सामाजिक कार्य अगदी मनापासून केले असून याचा फायदा अनेक गरीब व गरजू लोकांना झालेला आहे.आणि त्यामुळेच ही निवड करण्यात आली आहे.त्यामुळे भविष्यात खांद्याला खांदा लावून सर्वच संघटित व असंघटित कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी रस्त्यावरची लढाई तसेच प्रशासकीय पातळीवरील  लढाई व जबाबदारी सहज व संघटितपणे लढू असे यावेळी सौ. जयश्री पाटील यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा