जि.प. प्राथमिक शाळा, सलगरा दिवटी येथील विद्यार्थ्यांना करण्यात आले स्वाध्याय पुस्तिकेचे वाटप.
सलगरा (दि.) - प्रतिनिधी
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या वतीने स्वखर्चातून शालेय विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. शाळेच्या शिक्षकांनी "शाळा बंद पण शिक्षण चालू" या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणाबरोबरच शिक्षकांच्या स्वखर्चातून विद्यार्थ्यांना या स्वाध्याय पुस्तिकेचे वाटप केल्याने सर्व शिक्षक वर्गांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या वेळी मुख्याध्यापक महादेव सालपे, सतिश इंगळे,गणेश भोसले, भुषण ठानांबिरे, प्रशांत चव्हाण, गितांजली लोभे, कमल पोपळभट, सुचिता बिराजदार, अर्चना ढवारे, सुनिता भक्ते आदी शिक्षक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा