गोकुंदा,किनवट येथे शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी...
नांदेड प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची ११३ वी जयंती गोकुंदा येथे टायगर ग्रुप च्या वतीने साजरी करण्यात आली...
ऐन तारुण्यात देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या या भारतमातेच्या शूर सुपुत्रास, देशभक्ती, शौर्य आणि पराक्रमाचे अद्वितीय प्रतिक असलेल्या भगतसिंह यांना जयंती निमित्त गोकुंदा येथे टायगर ग्रुप व सर्व शहीद भगतसिंग प्रेमींनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले...
यावेळी,अमोल जाधव,बालाजी बामणे,अंबादास चव्हाण,रोहित भिस्से,विक्की वाघमारे,प्रमोद कोसरे,सोनू गायकवाड,संग्राम शेवाळे यांच्या सह टायगर ग्रुप व सर्व शहीद भगतसिंग प्रेमी बांधव उपस्थित होते...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा