संभाजी ब्रिगेडची गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता अभियान पदाधिकाऱ्यांनी राबवावे--जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे हरसदकर
सोनखेड येथे झाल्या संभाजी ब्रिगेडच्या नुतन पदाधिकार्यांच्या निवडी...
---------------------------------------------------------
नांदेड प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
संभाजी ब्रिगेडची गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता अभियान पदाधिकाऱ्यांनी राबवावे असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे नांदेड जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे यांनी सोनखेड येथे केले...
सोनखेड तालुका लोहा येथे संभाजी ब्रिगेडचे नांदेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची बैठक दिनांक दि.1ऑक्टोंबर रोजी घेण्यात आली.
या बैठकीत जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे यांनी संभाजी ब्रिगेडच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड पुढील प्रमाणे केली...
जिल्हा कार्याध्यक्ष शंकर घोरबांड,लोहा विधानसभा अध्यक्ष माधव घोरबांड,लोहा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, उपाध्यक्ष संजय जाधव,तालुका संघटक पिंटू तुपेकर,लोहा तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष किरण बाबर,आदी निवडी करण्यात आल्या.
यावेळी पुढे बोलताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे म्हणाले की संभाजी ब्रिगेड चा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर झाला असून खेडेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षांपूर्वी संभाजी ब्रिगेड हे आता राजकीय पक्ष झाला आहे.संभाजी ब्रिगेड असा एकमेव राजकीय पक्ष आहे तिथे शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय मिळतो पद मिळते संभाजी ब्रिगेड कार्यकर्ता निर्माण करण्याची मशीन आहे.संभाजी ब्रिगेडच्या या नुतन पदाधिकाऱ्यांनी आता गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता अभियान राबवावे प्रत्येक गावात आपले कमीत कमी दहा तरी कार्यकर्ते असावे.आता लोहा तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागणार आहेत संभाजी ब्रिगेडच्या वतीने संपूर्ण ताकदीनिशी लढविण्यात येणार आहेत तसेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती ,नगर पालिकासह संपूर्ण निवडणुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने लढविण्यात येणार आहेत असे सुभाष कोल्हे म्हणाले.
यावेळी संभाजी ब्रिगेड शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा मोरे जिल्हा उपाध्यक्ष राम आनकाडे जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश कदम गजानन इंगोले सुरेश मोरे सतीश धुमाळ माधव पवार सुदर्शन कदम संग्राम मोरे दिपक भरकड नितीन कोकाटे माणिक हांबर्डे रमेश बस्वदे गजानन घोरबांड कृष्णा घोरबांड विकास पाचांळ आदी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा