Breaking

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०

स्वाभिमानी शेतकरी संघटना करमाळा तालुका कार्यकारिणी जाहीर* *



*स्वाभिमानी शेतकरी संघटना करमाळा तालुका कार्यकारिणी जाहीर* 


*अतुल वारे पाटील -करमाळा*
करमाळा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये संघटनेची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
  स्वाभिमानी शेतकरी संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष तानाजी बागल,  युवा अध्यक्ष विजय रंदवे, जिल्हा पक्षाध्यक्ष शिवाजी पाटील, पंढरपूर ता. अध्यक्ष सचीन पाटील, माढा ता.अध्यक्ष सत्यवान गायकवाड,व मेजर जाधव आदींच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यकारिणी जाहीर आली .करमाळा तालुक्यातील रयत क्रांतीचे करमाळा तालुका युवा अध्यक्ष दिपक शिंदे व बळीराजा  संघटनेचेचे ता.अध्यक्ष आंण्णासाहेब सुपनवर व सामाजिक कार्यकर्ते तानाजी शिंदे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश केला.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-
जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे,
जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब झोळ,करमाळा तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके,
ता.युवा अध्यक्ष अमोल घुमरे,
ता.पक्षाध्यक्ष बापु फरतडे,
ता.ऊपाध्यक्ष तानाजी शिंदे,
ता.उपाध्यक्ष बापु वाडेकर आदी निवडी जाहीर करण्यात आल्या.
  यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष तानाजी बागल म्हणाले की, सध्या शेतकऱ्याला कोणीही वाली नाही. राज्यकर्ते, व्यापारी यांच्या मगरमिठीतून शेतकऱ्याला सोडवण्यासाठी तसेच त्याच्या घामाला योग्य  दाम देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही एकमेव संघटना राज्यात कार्यरत असून यापुढे शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात नूतन पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवावा व त्याला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करण्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
यावेळी मराठा सेवा संघ करमाळा तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील,सचिव सचिन शिंदे,छत्रपती फौंडेशन चे संस्थापक नानासाहेब वारे,जातेगाव ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब धुमाळ,विक्रम शिंदे,शिवाजी तोरडमल,तुषार शिंदे,भैया माने,अण्णासाहेब झोळ,नंदकुमार शिंदे,सागर माने ,सतीश भोगे, महादेव लोंढे,अण्णा गावडे,सर्जेराव फावडे,सदाशिव गाडे आदी उपस्थित होते.नूतन तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा