बुद्रुकवाडीतील पशुचिकित्सा शिबिरात 185 जनावरांची तपासणी व लसीकरण
माढा प्रतिनिधी/राजेंद्र गुंड
- माढा तालुक्यातील बुद्रुकवाडी येथील ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत पशुचिकित्सा शिबिरामध्ये विविध जातीच्या 185 जनावरांची तपासणी करून लसीकरण केले तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र चौगुले व डॉ.श्रीकांत डोलारे यांनी पशुगणना क्रमांक देत मार्गदर्शन केले.
या शिबिराचे उद्घाटन सरपंच संदिप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील गुंड यांनी केले.
सध्याच्या वातावरणात ग्रामीण भागातील गोरगरीब व कष्टकरी पशुपालकांच्या एकाही जनावरांना लाळ्या,खरखुत व इतर कोणत्याही रोगाची लागण होऊ नये म्हणून हा मोफत लसीकरणाचा व पशुगणना क्रमांक देण्याचा उपक्रम राबविला असल्याचे सरपंच संदीप पाटील यांनी सांगितले आहे.
याप्रसंगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जनावरांचे योग्य संगोपन व आहाराबाबत माहिती दिली तसेच सध्याच्या परिस्थितीत जनावरांच्या काळजी कशी घ्यायची याबाबत पशुपालकांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शिवशंकर केसरे,डॉ.उंबरे, बबन मोटे,जयराम नवले,श्रीहरी आतकरे,सज्जन दळवी,सुनील गुंड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
फोटो ओळी- बुद्रुकवाडी ता.माढा येथे पशुचिकित्सा शिबिरामध्ये तपासणी करताना डॉ. राजेंद्र चौगुले,सरपंच संदीप पाटील व इतर मान्यवर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा