Breaking

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०

आमदार बबनदादा शिंदे यांनी चक्क झाडाखालीच सोडलं घरच्या भाकरीचं गाठोडं



आमदार बबनदादा शिंदे यांनी चक्क झाडाखालीच सोडलं घरच्या भाकरीचं गाठोडं

अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या पंढरपूर तालुक्यातील पाहणी दौऱ्यातील विशेष प्रसंग
AJ 24 Taas News Maharashtra
माढा प्रतिनिधी - राजेंद्र गुंड


माढा प्रतिनिधी 
मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे माढा विधानसभा मतदारसंघातील भिमा नदीच्या काठावरील व परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे याची पाहणी करण्यासाठी दिनांक 19 व 20 ऑक्टोंबर रोजी आमदार बबनदादा शिंदे पंढरपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत व्यथा जाणून घेतल्या त्यांना धीर दिला विशेष बाब म्हणजे या दोन दिवशीय दौऱ्यात त्यांनी स्वत:च्या घरचंच भाकरीचं गाठोडं सोडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाखाली गवतावर बसून निसर्गाच्या सान्निध्यात कोणताही बडेजाव व डामडौल न करता जेवण करून साधेपणाचा एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

या दोन दिवशीय पाहणी दौऱ्यात त्यांच्यासमवेत नेतेमंडळी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा लवाजमा होता परंतु या वेळी ते जेवणासाठी कोणत्याही नेत्याच्या घरी किंवा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेले नाहीत तर त्यांनी आपल्या सोबत आणलेले भाकरीचं गाठोडं घेऊन झाडाखालील पटांगणात गवतावर बसून दुपारच्या वेळी जेवण करीत होते यावरुन एक बाब लक्षात येते की, आमदार बबनदादा शिंदे यांची राहणी अत्यंत साधी असून गोरगरीब व कष्टकरी शेतकऱ्यांची कामे करण्याची पद्धत अत्यंत उच्च दर्जाची आहे.आपण जर सध्याच्या काळातील राजकारणी मंडळींचा विचार केला तर साध्या ग्रामपंचायत सदस्यांचे पाय सुद्धा हवेत असतात मग सरपंच,सभापती, आमदार,खासदार,मंत्री आणि अधिकाऱ्यांचा तर गाजावाजा व डामडौल आणि थाटामाट विचारायलाच नको परंतु या सर्व बाबींचा अपवाद म्हणजे आमदार बबनदादा शिंदे आहेत हेच त्यांनी आपल्या या अगदी सहजसाध्य कृतीतून दाखवून दिले आहे.त्यांनी आदेश दिला किंवा सांगितले तर ते कोठेही जेवण करू शकले असते परंतु कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोणालाही त्रास नको म्हणून त्यांनी ही विशेष खबरदारी घेतली होती.

त्यांच्या जेवणात म्हणाल तर चपाती, सुकी व पातळ भाजी,कांदा,ककडी, वरण,भात अशा सर्वसामान्य व्यक्तींच्या घरी असणारे पदार्थ होते.त्यांच्यासमवेत त्यांचे स्वीय सहाय्यक,गाडीचे ड्रायव्हर सोबतीला असत म्हणजे सलग 6 वेळा माढा विधानसभा मतदारसंघाचे सक्षमपणे नेतृत्व करणारे आमदार किती साधेपणाने व कसलाही डामडौल न करता भारतीय बैठक मांडून जेवतात ही बाब निश्चितच कौतुकास्पद आणि आदर्शवत आहे.

फोटो ओळी- पंढरपूर तालुक्यातील नुकसान पाहणी दौऱ्यात झाडाखाली गवतावर बसून जेवण करणारे साधे आमदार बबनदादा शिंदे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा