*कन्हेरगांवात बिबटयाचा शेळीवर हल्ला नागरिकांत घबराट*
*कन्हेरगाव प्रतिनिधी/ धनंजय मोरे*
माढा तालुक्यातील टेंभुर्णी -केम रस्त्यावर असलेल्या कन्हेरगाव येथे कन्हेरगाव - दहिवली शिवरस्ता परिसरात बिबटयाने दहशत निर्माण केली असून बुधवारी रात्री कन्हेरगाव येथील नवनाथ रंगनाथ डोके या शेतकऱ्याची शेळी फस्त केली आहे. त्यामुळे कन्हेरगाव परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी दुपारी दहिवली केम रोडच्या पूर्वेला सातपुते वस्तीतील एका महिलेने प्रत्यक्ष बिबट्या ला पाहिल्याचे समजते. त्यानंतर बिबट्या उसात पळून गेला. तर सदर महिला घाबरून घरी पळत सुटली. गेल्या दहा दिवसात निमगाव, दहिवली ,उपळवटे, कंदर, कन्हेरगाव, ढवळस, शेडशिगे, सातोली या गावातील शिवारात बिबटयाचा वावर आहे
मंगळवारी रात्री दहिवली येथील उज्वला निवास खोचरे याची शेळी बिबटयाने फस्त केली असुन या आठवड्यात निमगाव 2 दहिवली 1 व कंदर येथे दोन शेळ्या तर कन्हेरगाव येथे एक शेळी खाल्ली आहे. या परिसरात शेतकर्यांना मधून प्रचंड घबराट पसरली असुन वस्तिवर रहाणारे शेतकरी जीव मुठित घेउन जगत आहेत
शेतात मजूर ही कामास धजावत नाहीत, शिवारे बिबटयाच्या भितीने ओसपडली असुन वन खात्याने मात्र फक्त दोन ठिकाणी बिबट्या पकडण्यासाठी सापळा लावला आहे. गुरुवारी दुपारी कन्हेरगाव येथे डोके यांच्या वस्तीवर वनसेवक हरिभाऊ मोरे, तानाजी अटकळे, शिवाजी दळवी, अशोक यादव यांनी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता ते ठसे बिबट्या चेच असल्याचे सांगितले.
या परिसरात वनखात्याने या बिबटयाचा प्रभावी पणे बदोबस्त करून बिबट्या पकडावा व शेतकऱ्यांची बिबट्या पासून सुटका करावी अशी मागणी कन्हेरगाव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे, दहिवली चे सरपंच तय्यब जहागिरदार यांनी केली आहे.
बिबटयाचा बदोबस्त करण्यात वनखाते अपयशी ठरले असुन वनखात्याच्या कारभाराविषयी शेतकऱ्यांतुन संताप व्यक्त होत आहे
सध्या पेरणीची व शेतीच्या मशागत ची कामे शेतात सुरू आहेत परंतु बिबट्या कोठेही येईल आणी हल्ला करेल यामुळे जनावरे शेळ्या कोणीही चरावयास सोडत नाहीत लहान मुले म्हातारी मानसे जिवमठित धरून जगत आहेत.
चौकट . . . बिबटयाचा बंदोबस्त करण्यात वनखाते अपयशी ठरले असून शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत असल्याने कन्हेरगाव येथे बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा . - धनंजय मोरे . मा. उपसरपंच कन्हेरगाव.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा