*ग्रामपंचायत सदस्य शितल नाना कांबळे मित्रपरिवाराने केली पुरग्रस्तांना मदत.*
*रेडा प्रतिनिधी/शशिकांत सोनटक्के तालुका इंदापूर*
रेडा दि.16. बंगालचा उपसागर मध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन महाराष्ट्रामध्ये पावसाने हाहाकार माजवला असून त्याचाच परिणाम म्हणून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात बुधवारी झालेल्या दिवसभर पावसामुळे व भीमा नदीला पूर आल्याने बावडा (गणेशवाडी) या गावातील लोकांचे कौटुंबिक साहित्य व जीवनावश्यक वस्तू पाण्याखाली सापडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली, यात सामाजिक भान ठेवणारे सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य बावडा शितल (नाना) कांबळे यांनी स्वखर्चाने पूरग्रस्तांना अन्न व फळे वाटप केले.व पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी अमोल (रावण)कांबळे, मुन्ना कांबळे,भैया जाधव, विजय भाऊ मोरे, ऋषी कांबळे,निलेश भोसले, आकाश कांबळे उपस्थित होते.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा