Breaking

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

महिलांवरील अन्याय व अत्याचारावर निर्बंध अाणनेसाठी कायदा कडक करावा. अंकिता पाटील



महिलांवरील अन्याय व अत्याचारावर निर्बंध अाणनेसाठी कायदा कडक करावा.  अंकिता पाटील 


AJ 24 Taas News Maharashtra
  इंदापूर प्रतिनिधी: शिवाजी पवार

 महिला सुरक्षा तसेच महिला व युवती यांच्यावर वारंवार होणारे अत्याचार, हल्ले व त्यासंदर्भाततील उपाययोजना  याबाबत पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांची दि.७ ऑक्टोंबर रोजी  जिल्हा परिषद सदस्या कु. अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांनी भेट घेतली व चर्चा केली. यावेळी युथ कनेक्टच्या स्नेहल शिवाजी बांगर उपस्थित होत्या.

 कु. अंकिता पाटील म्हणाल्या की,'  स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. प्रत्यक्षात सरकारी आणि सामाजिक संस्थांनी स्त्री अत्याचाराची जी आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे, ती पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष नोंद होणाऱ्या तक्रारीवरून दिली आहे. परंतु नोंद होणाऱ्या घटनांपेक्षाही अनेक कारणांमुळे नोंद न होणाऱ्या घटनांचीही संख्या जास्त आहे. आकडेवारीवरून एक नजर टाकली तर स्त्री अत्याचाराचे भीषण वास्तव दिसून येईल. स्त्रियांवरील अन्याय,अत्याचार दूर करण्यासाठी प्रभावी कायदे आणि त्यांची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहेच, परंतु त्याबरोबरच आवश्यक आहे ती जनजागृती.'
      
   यावेळी माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील लिखित विधानगाथा हे पुस्तक अंकिता पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेशजी देशमुख यांना भेट दिले.
____________________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा