हाथरस बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी.
लहुजी शक्ती सेना इंदापूर तालुका यांचेतर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक बावडा यांच्या द्वारे केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे मागणी.
इंदापूर प्रतिनिधी/ शिवाजी पवार
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मागासवर्गीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची जीभ छाटून जीवे मारण्याच्या उद्देशाने तिची मान मोडून गंभीर अवस्थेत फेकण्यात आले. त्यातच ही तरुणी मरण पावली. लहुजी शक्ती सेना इंदापूर तर्फे या घटनेचा जाहीर निषेध करुन यात दोषी असणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच तेथील जबाबदार शासकीय अधिकारी ज्यांनी या प्रकरणाचा तपास करण्यास दिरंगाई केली. त्यांना बडतर्फ करण्यात यावे .अश्या मागण्याचे निवेदन लहुजी शक्ती सेनेच्या इंदापूर तालुका दक्षिण उपाध्यक्ष नाना गायकवाड यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक बावडा यांच्या मार्फत प्रधानमंत्री व केंद्रीय गृहमंत्री यांना देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की
पिडीत मुलगी ही वाल्मिकी समाजाची असुन वाल्मिकी समाज हा मागासवर्गीय समुहा पैकी आहे.सदर पिडीतीच्या गावात त्यांचे तीनच कुटुंब वास्तव्यास आहेत.त्यामुळे सदर कुटुंबावर इतरांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे.सदर पिडीतेच्या कुटुंबाची परवानगी न घेता रात्रीच्या तीन वाजता मयत मुलीचा अंत्यविधी उरकल्या मुळे स्थानिक प्रशासना बाबत शंका निर्माण होत आहे.
तरी लहुजी शक्ती सेना इंदापूर यांच्या मार्फत इंदापूर तहसीलदार, इंदापूर सहाय्यक पोलीस निरीक्षक बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री यांना सदर निवेदना द्वारे मागणी करण्यात आली आहे की सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालुन दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच तेथील बेजबाबदारपणे वागलेल्या प्रशासकीय अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे.पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करुन कुटुंबातील व्यक्तींना व साक्षीदार यांना योग्य सुरक्षा पुरवण्यात यावी.
तरी या विषयाची गांभीर्याने दखल न घेतल्यास लहुजी शक्ती सेना इंदापूर यांच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात कार्यकर्त्यांनी दिला.
यावेळी लहुजी शक्ती सेना इंदापूर तालुका दक्षिण उपाध्यक्ष नाना गायकवाड,लखन वायदंडे,विजय साठे,हर्षद मिसाळ, समाधान गायकवाड, हनुमंत मिसाळ, सुनील भिसे, रामेश्वर खिलारे, पप्पु संकट,बंडू मिसाळ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा