Breaking

रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

*पिंपळनेर परिसरात ढग फुटी सदस्य जोरदार पाऊस**


*पिंपळनेर परिसरात ढग फुटी सदस्य जोरदार पाऊस*

AJ 24 Taas News Maharashtra
*निमगाव (टे) प्रतिनिधी*

निमगाव ( टे )दि 11 
माढा तालुक्यातील पिंपळनेर परिसरात रविवारी दुपारी ढग फुटी सदस्य पाऊस पडल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले पिंपळनेर भोइंजे रस्ता पिंपळनेर टेंभुर्णी रस्ता पिंपळनेर डोन वाडी रस्ता त्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे

या पावसामुळे पेरलेली ज्वारी काढण्यात आलेली केळी डाळिंब द्राक्ष मका ऊस या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे
पिंपळनेर येथील सुमारे वीस ते पंचवीस घरांमध्ये पावसाचे अचानक पाणी शिरल्यामुळे घरातील लहानसहान वस्तू ज्वारी गहू तांदूळ हे भिजल्यामुळे गोरगरिबांचे प्रचंड हाल झाले

सध्या परतीचा पाऊस सुरू झाला असून दिवसाच्या उघडी की नंतर पिंपळनेर परिसरासह निमगाव दहिवली उपळवटे बादलेवाडी पालवण सापटणे तांबवे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना आदीसह संपूर्ण माडा तालुक्यात प्रचंड पाऊस झाला अनेक शेतकऱ्यांच्या पुढे या मोठ्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे
अगोदरच गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून कोरोना संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असतानाच
या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे गेल्या सात-आठ महिन्यांपासून अनेक पिकांना दरच न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला असतानाच या पावसामुळे एक नवे संकट शेतकर्‍यांपुढे उभे राहिले आहे
माढा तालुक्यात साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत त्यासाठी ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या तालुक्यात ठिकाणी वास्तव्यास असल्याचे दिसून येत आहे या पावसामुळे त्यांचेही प्रचंड हाल झाले असून साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुमारे पंधरा दिवस पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली असून ऊसतोड कामगारांचे प्रचंड हाल होत आहेत

गतवर्षी उशिरा झालेला पाऊस त्यामुळे उशिरा झालेली उसाची लागवड यामुळे उसास एकरी टनेज कमी मिळेल असा अंदाज उस उत्पादक शेतकऱ्यांतुन व्यक्त होत आहे
पावसाने नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांतुन होत आहे

.....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा