Breaking

रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ...चौघांविरूध्द टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..




सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ...
चौघांविरूध्द टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

बेंबळे प्रतिनिधी/सज्जन शिंदे 
बेंबळे प्रतिनिधी:- मुलबाळ होत नाही म्हणून विवाहेतेचा सतत छळ करून सोडचिठ्ठी देण्यासाठी तगादा लावल्याने सासरच्या लोकांना कंटाळून विवाहीतेने विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना चौभे पिंपरी तालुका माढा येथे घडली. तृप्ती (उर्फ पूजा) धनाजी खताळ (वय २३) असे आत्महत्या केलेल्या विवाहीतेचे नाव आहे.


या प्रकरणी विवाहीतेच्या वडिलांनी टेंभुर्णी  पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची मुलगी तृप्ती (उर्फ पूजा) हिचे लग्न अडीच वर्षांपूर्वी धनाजी भगवान खताळ याच्यासोबत लावून दिले होते. विवाहीतेचा नवरा धनाजी भगवान खताळ, सासरा भगवान दशरथ खताळ, सासू मंगल भगवान खताळ व धनाजी चा मामा आप्पा लठ्ठे या चौघांनी मिळून विवाहीतेला मूलबाळ होत नाही, तु वांझोटी आहे, सोडचिठ्ठी दे असे म्हणून तिला सतत त्रास देऊन तिचा छळ करत दमदाटी करून मारहाण करीत होते. म्हणून तिने त्या त्रासाला कंटाळून विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली.

दरम्यान विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी धनाजी भगवान खताळ, भगवान दशरथ खताळ, मंगल भगवान खताळ तिघे राहणार चोभेपिंपरी, मामा आप्पा लठ्ठे तांबवे तालुका माढा या आरोपींवर भादवि कलम ४९८अ, ३०६, ५०४, ५०६ या प्रमाणे टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी भेट दिली असून अधिक तपास पो नि केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शितोळे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा