Breaking

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२०

हाॅटेल आबासाहेब चे करमाळ्यात आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते उदघाटन**



*हाॅटेल आबासाहेब चे करमाळ्यात  आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते उदघाटन*


*अतुल वारे पाटील करमाळा*:-  
  करमाळा येथे विजयादशमीच्या शुभमुर्हतावर जामखेड बायपास चौक, करमाळा येथे  आबासाहेब हाॅटेल चे उदघाटन आमदार संजय मामा शिंदे यांचे हस्ते करण्यात आले.  यावेळी हाॅटेल मालक सुनील  सावंत ,कृ.उ.बा.समिती चे संचालक चंद्रकात  सरडे, अर्बन बॅंकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी,पं स सदस्य दत्तात्रय जाधव. कृ.उ.बा.समिती चे सभापती शिवाजी बंडगर, विदया विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, कारखाने चे संचालक डाॅ हरीदास केवारे, पंचायत समिती चे सदस्य अॅड राहुल सावंत  तानाजी झोळ नगरसेवक अल्ताफ ताबोंळी नगरसेवक प्रवीण जाधव नगरसेवक अतुल फंड महादेव फंड विनय ननवरे. डाॅ कोग्रेकर चंद्रहास निमगीरे  करमाळा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष दादासाहेब सावंत ,यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटीलकरमाळा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत यांच्यासह करमाळा तालुक्याच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
            यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, हॉटेल आबासाहेब हे आपल्या उत्कट दर्जा व सेवा यांच्या आधारावर नक्कीच नावलौकिक प्राप्त करेल.हाॅटेल व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहकांना स्वादिष्ट चविष्ट जेवणाची उत्तम सोय करण्यात यावी . या हाॅटेल च्या अनेक शाखा व्हाव्यात अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी बोलताना दिल्या.
         आभार बांधकाम समिती चे सभापती संजय सावंत यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा