आ. बबनराव शिंदे यांनी केली सिना माढा योजनेची पाहणी.
कन्हेरगांव दि. प्रतिनिधी
आ. बबनराव शिंदे यांनी फुटजवळगांव तालुका माढा येथे सिना माढा उपसा जलसिंचन योजनेची सोमवारी दुपारी अधिकार्यांना सोबत घेऊन पाहणी केली. सिना माढा योजनेच्या फुटजवळगांव येथील पहिल्या एअर व्हाॅल्व च्या ठिकाणी सिना माढा चा तिन नळ्या पैकी एक नळी ( पाईप ) जमिनीपासून वर आल्यामुळे शेतकर्यांचे रस्ते बंद झाले होते. याची पाहणी करण्यासाठी आ. शिंदे सिना माढा च्या फुटजवळगांव साईटवर आले होते.
यावेळी कार्यकारी अभियंता, उजनी धरण आर. पी. मोरे, सेवानिवृत्त मुख्य अभियंता तोंडे, शाखा अभियंता लोंढे, उप अभियंता गोरे, कार्यकारी अभियंता ( यांत्रिकी विभाग ) जाधव, फुटजवळगांव चे माजी उपसरपंच शशिकांत पाटील, अकोले खुर्द चे सरपंच किसन घाडगे, कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे, प्रकाश घाडगे, अभिजित नवले, रामभाऊ घाडगे, राहुल वाघमोडे, नागनाथ गोरड, राजाभाऊ शिंदे, बापू शिंदे आदी उपस्थित होते. गेल्या आठवडय़ात झालेल्या मुसळधार पावसामुळे सिना माढा योजनेची पाईपलाईन जमिनीपासून वरती आली आहे. त्या संदर्भात आ. बबनराव शिंदे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांना प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सिना माढा योजनेच्या मुख्य साईटवर बोलावून घेऊन योजनेची पाहणी केली. त्यानंतर पुरामुळे वर आलेल्या पाईपलाईन ताबडतोब पूर्ववत बसवून घेऊन दुरूस्ती करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सिना माढा योजनेची कडेला असलेल्या झाडे झुडपे साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आ. शिंदे यांनी ज्या वेळेस सिना माढा योजना कार्यान्वित झाली त्यावेळेस चे सेवानिवृत्त मुख्य अभियंता तोंडे यांनीही सविस्तर माहिती घेण्यासाठी बोलावून घेतले होते.
चौकट
मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना नाशिक यांच्याकडून दुरूस्ती संदर्भात उपाययोजना मागवून त्याप्रमाणे दुरुस्तीची कार्यवाही त्वरित करण्यात येणार आहे.
श्री. आर. पी. मोरे .
कार्यकारी अभियंता उजनी धरण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा