Breaking

बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२०

हनुमंत उबाळे यांची खात्यांतर्गत परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड. विठ्ठलवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ;



हनुमंत उबाळे यांची खात्यांतर्गत परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड


विठ्ठलवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ; अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळख

माढा / प्रतिनिधी- राजेंद्र गुंड

- माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे मूळ रहिवासी व सध्या नवी मुंबई येथे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणारे हनुमंत पांडुरंग उबाळे यांची सन 2013 मध्ये घेण्यात आलेल्या खात्यांतर्गत पात्रता स्पर्धा परीक्षेत‌ 300 पैकी 227 गुण प्राप्त केल्याने त्यांची पोलिस उपनिरीक्षक पदी 20 ऑक्टोंबर रोजी नवी मुंबई येथे निवड झाली आहे.

हनुमंत उबाळे यांनी नवी मुंबई येथे आतापर्यंत 34 वर्षे पोलिस खात्यात उत्कृष्टरित्या कामगिरी बजावली आहे त्यामुळे शासनाने त्यांना एक वाढीव वेतन वाढ दिली आहे. त्यांनी या सेवेत गुन्हे व गुन्हेगारांच्या तपासासाची आणि शोधाची मोहीम अनेक वेळा यशस्वी केली आहे त्यामुळे शासनाने त्यांना आजतागायत वेगवेगळ्या कामगिरी बद्दल 274 बक्षिसे दिली आहेत.विशेष बाब म्हणजे त्यांचे जावई शीतलकुमार कोल्हाळ हे सुद्धा सोलापूर येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन आमदार बबनदादा शिंदे,जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, उपशाखापमुख मोहन कदम,आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड,पोलीस उपअधीक्षक सचिन कदम,पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम,रामचंद्र घोंगाणे,दिलीप थोरात,विठ्ठल गुंड, समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.मोहन शेगर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष नागटिळक, सहाय्यक पोलिस निरीक्षक बिभिषण गव्हाणे,पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे,पोलीस उपनिरीक्षक अमोल अनभुले,सहव्यवस्थापक अंकुश डुचाळ,उपशिक्षणाधिकारी नितेश कदम,विक्रीकर अधिकारी बंडू खरात,चेअरमन अनिलकुमार अनभुले,सरपंच अरुण कदम, उपसरपंच अनिलकुमार बरकडे, तंटामुक्ती अध्यक्ष अरुण मोरे,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे, उपलेखापरीक्षक सुहास शिंगाडे, सहव्यवस्थापक रोहीत कदम,पोलीस पाटील बालाजी शेगर,प्रा.हनुमंत कदम,डॉ.किशोर गव्हाणे, प्रा.कुंडलिक गुंड,डॉ.नेताजी कोकाटे, डॉ.संतोष कदम,प्रा.भिमराव माने,सत्यवान सुरवसे,नागनाथ बरबडे,दिनेश गुंड,सज्जन मुळे,सतीश गुंड,भिवाजी जाधव,अशोक जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा