*राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उपेक्षितांना न्याय देणार -प्रा गोवर्धन चवरे पाटील*
*अतुल वारे पाटील- करमाळा*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मला जनसेवेची संधी मिळाली असून उपेक्षित, गरीब , शेतकरी तसेच सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही नूतन सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा गोवर्धन चवरे पाटील यांनी दिली.मराठा सेवा संघ तसेच जातेगाव ग्रामस्थ यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी प्रा चवरे बोलत होते.यावेळी मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील, जातेगावचे उपसरपंच ईश्वर वारे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाचे प्रांतिक सदस्य नितीन झिंझाडे, उद्योजक रमेश भांडवलकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, सध्या सगळीकडे गोरगरीब लोकांची कुचंबना होत असून राजकीय पक्षांमध्ये सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ते उपेक्षितच आहेत.पण आपण अन्यायाविरुद्ध आवाज उठवून पक्षाचे संस्थापक शरदराव पवार यांचे विचार तळागाळात पोहोचण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्नशील राहणार आहोत.जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांचे अनमोल मार्गदर्शन आपल्याला मिळत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा