सामाजीक जानीवेतुन गेली २५ वर्षाचा वाद मिटवुन युवानेते पोपट कचरे यांनी दिला रस्ता करुन
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार
तरंगवाडी (ता. इंदापूर) येथील निमगाव केतकी ते बारामती रस्त्याला लागुन अनेक वाड्यावस्त्यांंकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करताना पोपट कचरे व ग्रामस्थ.
तरंगवाडी येथील गेल्या २५ वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण
तरंगवाडी(ता.इंदापूर जि.पुणे) तरंगवाडी येथील गेली काही दिवसापासून इंदापूर ते बारामती या रस्त्यापासून बुटे वस्ती ,शिंदे वस्ती, हरणावळ वस्ती ,सांगवे वस्ती, जाधव वस्ती, माने वस्ती जाणारा रस्ता ते कर्मयोगी कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक खड्डे पडल्याने पाणी साठवून रस्त्याची पूर्णपणे दुरावस्था झाली होती.
सदर रस्त्यावरून शेतकऱ्यांचा व नागरिकांचा रहदारीचा रस्ता असल्याने या रस्त्याचे दुरुस्ती करणे गरजेचे होते. या रस्त्यावर सामाजिक जाणीव जपणारे आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला, ञासाला व त्यांच्यावर येणार्या समस्या सोडवण्याच्या भूमिकेतून तरंगवाडी व तेथील दानशूर व्यक्तींनी या रस्त्यामधील अतिशय मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेल्या रस्त्यावर एक ते दीड किलोमीटर रस्ता मुरम टाकून भरून घेऊन रस्त्याची दुरुस्ती केली.
शेतकऱ्यांना जाण्यासाठी योग्य असा रस्ता करून दिला या रस्त्याला विशेष सहकार्य सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील, आण्णा नायर ,बाळासाहेब नरूटे उपसरपंच,इत्यादी मान्यवरांनी सहकार्य केले. तर या रस्त्याची देखभाल धनाजी गोफने आशोक करे ,काका देव्हारे, अनिल देव्हारे, प्रदीप बुटे, , विकास सांगवे इत्यादींनी केली .
हा रस्ता दुरुस्त केल्याने येथील जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकातून आनंद व्यक्त होत आहे. सर्व सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे कौतुक होत असल्याचे भाजपचे युवा कार्यकर्ते पोपट कचरे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा